हवामान खात्याचा देशातील 18 राज्यांमध्ये येलो अलर्ट


monsoon
दिल्ली-एनसीआरमध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे, त्यामुळे शहरातील विविध भागात पाणी साचले आहे. तर भारतीय हवामान विभागाने 29 ऑगस्ट रोजी दिल्ली आणि इतर 18 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा यलो अलर्ट घोषित केला आहे.

 

तसेच गेल्या चार दिवसांपासून गुजरातमध्ये सतत पाऊस पडत असून, त्यामुळे अनेक भागात पाणी साचले आहे. तर पंजाब, हरियाणा आणि चंदिगडमध्येही काल रात्रीपासून पाऊस पडत आहे. तसेच हे हवामान 31 ऑगस्टपर्यंत कायम राहील, अनेक राज्यांमध्ये वादळ आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे.  

 

आज अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागानुसार आज दिल्ली, पंजाब, हरियाणा, चंदीगड, गुजरात, महाराष्ट्र, ओडिशा, झारखंड, उत्तर प्रदेश, कर्नाटक, बिहार, पश्चिम बंगाल, छत्तीसगड तसेच अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू आणि काश्मीर, मेघालय, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, तामिळनाडू, केरळ, सिक्कीम आणि आसाम येथे देखील मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. 

Edited By- Dhanashri Naik 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top