महाराष्ट्र: मुलींचा पाठलाग करणे 15 वर्षाच्या मुलाला पडले महागात, पोलिसांनी घेतले ताब्यात


crime
महाराष्ट्रातील ठाण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार भिवंडी जिल्ह्यात मुलींची छेड काढणाऱ्या 15वर्षीय मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

 

काय आहे संपूर्ण प्रकरण?

पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, एका मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार, ही घटना सोमवारी रात्री आठच्या सुमारास घडली. पोलिसांनी सांगितले की, मुलगी रस्त्यावरून एकटी चालत असताना आरोपीने तिचा पाठलाग केला आणि तिच्याकडे आक्षेपार्ह हावभाव केले.

 

तसेच आरोपीने पीडितेच्या मैत्रिणी असलेल्या इतर तीन मुलींचाही त्याने पाठलाग केला. भिवंडी पोलिस ठाण्याच्या अधिकारींनी सांगितले की, तक्रारीनंतर अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले व सुधारगृहात पाठवण्यात आले आहे.

 

पोलिसांनी भारतीय न्याय संहिताच्या कलम 78 आणि पॉक्सो कायद्यानुसार आरोपींविरुद्ध एफआयआर नोंदवली आहे.

Edited By- Dhanashri Naik 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top