मुंबईत विविध दही-हंडी उत्सवात मानवी मनोरे रचताना पडून 41 गोविंदा जखमी


dahi handi
श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण सर्वत्र उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदाचे पथक उंच मानवी मनोरे रचून दही हंडी फोडतात आणि बक्षीस जिंकतात.मुंबईत श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या उत्सवात मानवी मनोरे(पिरॅमिड) रचताना 41 गोविंदा पडून जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या उत्सवात दहीहंडी उंचावर बांधली जाते त्यात दही, दूध, तूप, सफरचंद, केळी, डाळिंबाच्या बिया, द्राक्षे, काजू, बेदाणे, बदाम अशी काही कापलेली फळे स्वच्छ आणि नवीन भांड्यात टाकली जातात. यानंतर, पाणी घालून ते चांगले मिसळले जाते. हवेत बांधलेली ही हंडी(दह्याने भरलेले मातीचे भांडे) तोडण्यासाठी तरुण पथक ज्यांना गोविंदा म्हटले जाते उंच बहुमजली मानवी मनोरे रचतात. 

जो कोणी हंडी फोडेल त्याला बक्षीस दिले जाते.ती व्यक्ती हळूहळू सर्वांच्या खांद्यावर चढते, वर पोहोचते आणि भांडे फोडते. या उंच मनोऱ्यावरून अनेक गोविंदा खाली पडतात आणि त्यांना दुखापत होते. काही वेळा तर काहींचा अपघाती मृत्यू होतो. मुंबईत दुपारी 3 वाजेपर्यंत मानवी मनोरे रचण्याच्या प्रयत्नात 41 गोविंदा जखमी झाले.

त्यापैकी 8 जणांना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर इतरांना ओपीडी मध्ये उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. दहीहंडीच्या उत्सवात अनेक महिला गोविंदा देखील मानवी मनोरे रचून दहीहंडी फोडण्याच्या प्रयत्न करताना दिसल्या. 

Edited by – Priya Dixit   

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top