मोफत स्त्री रोग तपासणी शिबिर पेनुर येथे संपन्न
वंदे मातरम सामाजिक संस्थेचे सहकार्य
पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज : वंदे मातरम सामाजिक संस्था पेनुर ता.मोहोळ व भाग्यश्री हॉस्पिटल मॅटर्निटी अँड नर्सिंग होम पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने शिवानंद क्लिनिक पेनूर येथे मोफत स्त्रीरोग तपासणी व मोफत औषध उपचार शिबिर घेण्यात आले.
या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना समाधान गायकवाड यांनी रक्तदान शिबिरात एच.बी कमी असल्याने रक्तदान न करता महिलांना माघारी पाठवण्यात आले होते त्यासाठी त्यांना रक्तवाढीसाठी मोफत गोळ्या देण्यात याव्यात असे आवाहन करून गावातील महिलांच्या इतरही समस्या तपासण्यासाठी डॉ.भाग्यश्री स्वामी यांनी पुढाकार घेऊन उपस्थिती दर्शवली व मार्गदर्शन केले त्याबद्दल आभार मानले.
सदर शिबिरात 75 महिलांच्या विविध समस्यांची मोफत तपासणी करण्यात आली तसेच त्यांना मोफत औषधोपचार देण्यात आले.
या शिबिराच्या सांगताप्रसंगी भाग्यश्री हॉस्पिटल पंढरपूर चे प्रमुख डॉ.भाग्यश्री स्वामी यांचा सत्कार संस्थेचे सन्मान चिन्ह देऊन व एक रोप देऊन करण्यात आला.
याप्रसंगी डॉ.भाग्यश्री स्वामी यांनी सदर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असे सांगून समाधान व्यक्त केले.शिबिर यशस्वी करण्यासाठी शिवानंद क्लिनिक पेनूर चे डॉ.शुभम स्वामी व डॉ.पूजा भोसले-स्वामी यांनी विशेष परिश्रम घेतले तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी सौ.स्नेहल गायकवाड,मनीषा गवळी,रिना कसबे,सविता स्वामी,सज्जन गवळी,किशोर गवळी,दत्तात्रय शेंबडे,पंढरी शेंबडे,प्रथमेश सातव आदींनी शिबिर यशस्वी पाडण्यासाठी प्रयत्न केले.