वारानुसार या वस्तूंचे दान करा, धन वर्षाव होईल !


Daan

सनातन धर्मात दान करण्याचे विशेष महत्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार दान केल्याने व्यक्तीला पुण्य प्राप्ती होते. वैदिक ज्योतिष शास्त्राप्रमाणे दान केल्याने कुंडलीतील कमजोर ग्रहांची स्थिती मजबूत होते. नवग्रह मजबूत असल्यावर साधकाला जीवनात यश मिळण्याची शक्यता वाढते. आरोग्या सुधारतं. तथापि प्रत्येक दिवस कोणत्या न कोणत्या देवाला समर्पित आहे अशात वारानुसार आपण काही वस्तूंचे दान केल्यास विशेष फल प्राप्ती होते. तर चला जाणून घेऊया की कोणत्या दिवशी कोणते दान मात्र गुपचुप करावयाचे आहे- 

 

सोमवार – धार्मिक स्थळी सोमवारी पांढरी उशी दान केल्याने भौतिक सुख मिळते. आर्थिक स्थिती मजबूत झाल्यामुळे मानसिक शांती मिळते. सोमवारी तांदूळ दान केल्याने कीर्ती मिळते.

 

मंगळवार – ज्योतिष शास्त्राप्रमाणे मंगळवारी मंदिरात माचिस ठेवल्याने कुंडलीत मंगळाची स्थिती मजबूत होते. मंगळाच्या बलामुळे आत्मविश्वास वाढतो. तसेच एकाग्रता शक्ती वाढते.

 

बुधवार – बुधवारी गुप्त रुपात हिरव्या रंगाच्या वस्तू दान करणे शुभ ठरतं. या दिवशी तुम्ही मंदिरात हिरवा दिवा दान करू शकता. याशिवाय मंदिरात 7 ते 11 मेणबत्त्या पेटवल्याने मानसिक शांती मिळते.

 

गुरुवार – गुरुवारी मंदिरात पिवळ्या रंगाची छत्री दान करणे खूप शुभ मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार छत्री दान केल्याने व्यक्तीच्या जीवनातील समस्या दूर होतात. यासोबतच संपत्तीही प्राप्त होते.

 

शुक्रवार – मंदिरात गुपचूप मीठ दान केल्याने रोगांपासून आराम मिळतो. पण मीठ नेहमी सकाळी दान करावे. संध्याकाळी मीठ दान करणे टाळावे. जर तुमच्या घरात कोणी सतत आजारी असेल तर शुक्रवारी त्यांच्या हातातून मीठ दान करा. त्यामुळे काही वेळातच त्यांची प्रकृती सुधारण्यास सुरुवात होईल.

 

शनिवार – शनिवार हा न्याय देणाऱ्या शनिदेवाला समर्पित आहे. या दिवशी काळ्या रंगाच्या वस्तू दान करणे शुभ असते. या दिवशी गुपचुत मोहरीचे तेल किंवा काळे तीळ टाकून मंदिरात दान केल्याने कुंडलीत शनीची स्थिती मजबूत होते. तसेच यशाचे नवे मार्ग खुले होतात.

 

रविवार – ध्वज दान करणे देखील शुभ आहे. राजकारणाशी संबंधित असलेल्या लोकांनी रविवारी गुप्तपणे ध्वज दान करावे. त्यामुळे समाजात आदर निर्माण होतो. याशिवाय रविवारी लाल रंगाच्या वस्तूंचे दान केल्याने कीर्ती आणि वैभव प्राप्त होते.

 

अस्वीकारण: ही माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून केवळ माहितीसाठी दिली जात आहे. वेबदुनिया याला दुजोरा देत नाही. कोणतेही उपाय करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top