पुण्यात रामगिरी महाराजांच्या निषेधार्थ आक्षेपार्ह घोषणाबाजी, गुन्हा दाखल



महंत रामगिरी महाराजांनी प्रेषित मोहम्मद यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे तीव्र पडसाद उमटले आहे.त्यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ पुण्यात निर्दशने निर्दशने करण्यात आली. या प्रकरणी पुणे पोलिसांनी 300 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. अशी माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली. 

महंत रामगिरी महाराजांच्या वक्तव्याच्या विरोधात शुक्रवारी पुण्यात सर्वधर्म समभाव महामोर्चा काढण्यात आला. या आंदोलनात रामगिरी महाराजांच्या विरीधात आक्षेपार्ह घोषणाबाजी केली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा मोर्चा परवानगी शिवाय काढण्यात आला असून या मोर्च्यात घोषणाबाजी केल्याने जातीय तेढ निर्माण झाली आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात मोर्च्यात भाग घेणाऱ्या सुमारे 300 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील शहा पांचाळे गावात नुकत्याच एका धार्मिक कार्यक्रमादरम्यान रामगिरी महाराज यांनी कथितरित्या आक्षेपार्ह टिप्पणी केली होती, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर रामगिरी महाराजांवर मुंबई, ठाणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गुन्हे दाखल करण्यात आले.

त्याच वेळी, प्रेषित मोहम्मद आणि इस्लाम यांच्याबद्दल कथित आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल रामगिरी महाराज यांच्याविरोधात देशाच्या अनेक भागात निदर्शने करण्यात आली. बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ आपण हे वक्तव्य दिल्याचं रामगिरी महाराजांनी सांगितले.

Edited by – Priya Dixit  

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top