मुंबईत महिला डॉक्टरांशी हाणामारी आणि शिवीगाळ करत धमकी दिली, गुन्हा दाखल


rape
कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेजचा प्रश्न अद्याप सुटलेला नसताना मुंबईतूनही अशाच प्रकारची घटना उघडकीस आली आहे. मुंबईतील साठे नगर भागातील एका महिला डॉक्टरला कोलकाता येथील प्रशिक्षणार्थी डॉक्टरसारखेच हाल करण्याची धमकी देण्यात आली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (24 ऑगस्ट) सायंकाळी मानखुर्द, साठे नगर येथील पीडितेच्या डॉक्टरांच्या दवाखान्यासमोर दुचाकी उभी करण्यावरून वाद झाला. महिला डॉक्टरने एका मुलाला रागावले.नंतर या मुलाने आपल्या सोबत  तिघांना आणले आणि महिला डॉक्टरला मारहाण करत शिवीगाळ केली. 

त्यापैकी एका आरोपीने महिला डॉक्टरला कोलकाताच्या ट्रेनी डॉक्टरसारखे हाल  करण्याची धमकी दिली. पीडित महिला डॉक्टरच्या तक्रारी नंतर एका तरुण आणि तीन महिलांच्या विरोधात तक्रार दाखल केली असून पोलीस त्यांच्या शोध घेत आहे. 

Edited By – Priya Dixit 

 

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top