युवकांच्या मागणीनंतर आ. समाधान आवताडे यांनी गतिरोधकाबाबत मुख्याधिकाऱ्यांना दिली कारवाईची सूचना

पंढरपूरच्या नागालँड चौकात होणार गतिरोधक

युवकांच्या मागणीनंतर आ समाधान आवताडे यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिली कारवाईची सूचना

पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – लिंक रोड आणि उपनगरी भागातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी नागालँड चौकात गतिरोधक आवश्यक आहे, अशी मागणी नागालँड चौकातील सामाजिक कार्यकर्ते आणि व्यावसायिकांनी आ.समाधान आवताडे यांच्याकडे केली. त्यांच्या मागणीची तत्काळ दखल घेत आ.समाधान आवताडे यांनी नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांना फोन करून नागालँड चौकात गतिरोधक करण्यासंदर्भात सूचना केली. त्यामुळे नागालँड चौकातील नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.

आ.समाधान आवताडे हे शनिवारी मनीषानगर भागात आले असता लिंक रोडवरील नागालँड चौकातील सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेऊन गतिरोधक करण्याची मागणी केली. आ आवताडे यांनी लागलीच चौकात थांबून फुटपाथवर बाकड्यावर बसून त्यांच्याशी चर्चा केली आणि तेथूनच नगरपालिका मुख्याधिकारी डॉ.प्रशांत जाधव यांना फोन करून गतिरोधक करण्याविषयी सूचना केली.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते धनंजय धोत्रे, राजन थोरात, किरण देवकते, भैय्या मांदळे, शिरीष थोरात, श्रीपाद श्रीखंडे, आशिष कदम, संकेत लिगाडे, शांतीलाल पवार, सारंग चौगुले, गणेश लिंगे, चिन्मय शिनगारे, आनंद भोसले, शेखर पवार आदी उपस्थित होते.

लिंक रोडवरून अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक असून ती वेगाने धावत असतात त्यामुळे याठिकाणी सतत अपघात घडत आहेत.या भागातील नागरिकांनी यासंदर्भात वारंवार तक्रारी केल्या आहेत मात्र काहीही फरक पडलेला नाही त्यामुळे आता आमदार समाधान आवताडे यांनी याबाबत लक्ष घालून न्याय मिळवून द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top