सातारा टिम तामीर तर्फे जे.के.आय उर्दू हायस्कूल सातारच्या विद्यार्थ्याचा गौरव पुरस्कार
सातारा टिम तामीर तर्फे 10वीच्या तीन जिल्ह्यातील सातारा, सांगली,कोल्हापूर येथील 10 वीतील आपआपल्या विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांची माहिती देण्यास सांगितली होती.यामध्ये प्रत्येक विषयात तसेच तिनही जिल्ह्यातील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक काढण्यात आले.
यामध्ये जे.के.आय उर्दू हायस्कूल सातारच्या शाळेचा विद्यार्थी कु.अदनान सर्फराज बेदरेकर याने तिन्ही जिल्ह्यातून इंग्रजी या विषयात तृतीय क्रमांक पटकावला आहे .या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कोल्हापूर मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष माजिद पटेल सर यांच्या हस्ते ट्राफी व सर्टिफिकीट देवून करण्यात आला.

या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन निसार पटेल, जनरल सेक्रेटरी हनीअहमद फरिद यांच्यासह सर्व संस्था सदस्य, शाळेच्या मुख्याध्यापिका कु.फरहिन अंजुम शेख,सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी, शाळा व्यवस्थापन समिती व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.