ऑटो रिक्षाच्या भाड्यावरून झालेल्या वादात सहकाऱ्याचा खून, मुंबईतील घटना


death
मुंबईत ऑटो रिक्षाच्या भाडे वरून झालेल्या वादात एका व्यक्तीने आपल्या सहकाऱ्याची हत्या केल्याची घटना कुर्ला येथे घडली आहे.या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. 

 

सदर घटना सोमवारी कुर्ला येथे आर्टीरियल एलबीएस रोडवर दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास घडली आहे. ऑटोरिक्षाच्या भाडे वरून कपड्याच्या कारखान्यात काम करणाऱ्या 28 वर्षीय तरुणाचा वाद त्याच्या सहकाऱ्याशी  झाला आरोपी त्याच कारखान्यात हेल्पर म्हणून कामाला आहे. 

ऑटो रिक्षाच्या भाड्यावरून त्यांच्यात वाद झाला आरोपीने तरुणाला बेदम मारहाण केली या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाला.आरोपी घटनेनंतर पसार झाला. 

पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तरुणाला मारहाण केल्याचे समोर आले. गुन्हे शाखेचे पथक प्रकरणाचा तपास करत असून आरोपीला संध्याकाळी कल्याण रेल्वे स्थानकावरून अटक केली.

पोलिसांनी आरोपीला पुढील कारवाईसाठी कुर्ला पोलिसांच्या ताब्यात दिले असून त्याला आज मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. 

Edited by – Priya Dixit   



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top