अनेक वेळा अन्याय झालेल्या आटपाडीलाच तिकीट द्यावे – सादिक खाटीक यांची मागणी
आटपाडी/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.११-१९५२ पासून झालेल्या एकूण १५ निवडणुकांमध्ये फक्त २ वेळा आमदार होण्याची संधी लाभलेल्या आटपाडी तालुक्याच्या वाट्याला किमान ५ वेळा तरी उपेक्षाच आली. हा अन्याय दुर करण्यासाठी राज्यातल्या महाविकास आघाडीने आटपाडी तालुक्यातील निष्ठावंतालाच विधानसभेला संधी द्यावी,अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी विभागाचे प्रदेशचे उपाध्यक्ष सादिक खाटीक यांनी केली आहे .
आटपाडी – कवठेमहांकाळ मतदार संघातून एक वेळा आटपाडीचे दिवंगत नेते आण्णासाहेब लेंगरे आमदार म्हणून विजयी झाले होते तर १९९५ साली खानापूर आटपाडी विधानसभा मतदार संघातून आमदार म्हणून अपक्ष उमेदवार राजेंद्र देशमुख विजयी झाले होते .
वास्तविक खानापूर व आटपाडी तालुक्याला किमान सात सात वेळा आमदारकी यायला हवी होती तथापि १३ वेळा खानापूर तालुका वासियच आमदार झाले.आटपाडी तालुक्याला आणखी ५ वेळा आमदारकी मिळायला हवी होती. मागचा झालेला मोठा अन्याय लक्षात घेऊन महाविकास आघाडीने आताच्या सोळाव्या टर्म पासून पंचवीसाव्या टर्म पर्यत फक्त आटपाडी तालुकावासियच आमदार झाला पाहीजे तरच आटपाडी तालुक्याला न्याय दिल्यासारखे होईल.
खानापूर विधानसभा मतदार संघातील जनता ही बहुसंख्येने राष्ट्रीय नेते शरद पवार यांच्या विचारांवर प्रचंड प्रेम करीत आलेली आहे याचा प्रत्यय वेळोवेळी आला आहे . त्यामुळे सर्वसामान्य जनता आटपाडी तालुक्यावर झालेल्या अन्यायाबाबत मोठी सहानूभूती व्यक्त करताना दिसत आहे असे सादिक खाटीक यांनी बोलून दाखविले आहे .