लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन
सोलापूर / ज्ञानप्रवाह न्यूज –उत्तर सोलापूर तालुक्यातील बाणेगाव येथील लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव मंडळाच्यावतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुक शुभारंभ प्रसंगी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी जयंती मिरवणुकीत सहभागी होऊन सर्वांना शुभेच्छा दिल्या.समाजबांधव, ग्रामस्थ मोठ्या संख्येने या मिरवणुकीत सहभागी झाले होते.