कल्याण पूर्व येथे शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून 13 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्यांची गळफास घेऊन आत्महत्या


suicide
कल्याण परिसरातील कल्याण पूर्व येथे शिवाजी कॉलोनी चिकणीपाडा भागात राहणाऱ्या एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलाने शिक्षिकेच्या त्रासाला कंटाळून टोकाचं पाऊल घेत गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली आहे. 

मयत विद्यार्थी इयत्ता आठवीत शिकत होता. त्याने एक सुसाईड नोट लिहुन ठेवली असून त्यात त्याने शिक्षिकेचे आणि वर्गात शिकणाऱ्या एका मुलाचे नाव लिहून ते मला चिडवतात म्हणून मी आपल्या आयुष्याला संपवत आहे असे लिहिले आहे. विघ्नेश प्रमोद कुमार पात्रा असे या मयत विद्यार्थ्यांचे नाव आहे. 

तो कल्याणच्या एका नामांकित शाळेत इयत्ता आठवीचा विद्यार्थी होता. तो कल्याण पूर्व शिवाजी कॉलोनीत चिकणीपाडा परिसरात आपल्या आई वडील आणि बहिणीसह राहत होता. 

रविवारी त्याचे वडील कामाला गेले आणि आई आणि बहीण बाहेर गेल्या असता तो घरात एकटाच होता. त्याने सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास गळफास घेत आत्महत्या केली. त्याने आत्महत्येपूर्वी एक सुसाईड नोट लिहिली त्यात शिक्षिकेचा आणि एका मुलाचा नावाचा उल्लेख करत हे मला चिडवतात म्हणून मी कंटाळून आत्महत्या करत आहे असे लिहिले. 

कोळशेवाडी पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यावर त्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत शव विच्छेदनासाठी पाठविले. पोलीस प्रकरणाचा पुढील तपास लावत आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.या घटनेमुळे त्याच्या कुटुंबात शोककळा पसरली आहे. त्यांनी या प्रकरणी दोषींवर कारवाई करत न्यायाची मागणी केली आहे.   

Edited by – Priya Dixit 

 

 

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top