नाशिकमध्ये शिवसेना महिला आघाडीच्या वतीने महिला सन्मान यात्रेचे आयोजन

नागरिकांच्या अधिकाराचे पैसे देणे ही भीक आहे का ?लाडकी बहिण योजनेवर टीका करणाऱ्या विरोधकांना डॉ.गोऱ्हे यांचा संतप्त सवाल

नाशिकमध्ये शिवसेना महिला आघाडीच्या वतीने महिला सन्मान यात्रेचे आयोजन

नाशिक / ज्ञानप्रवाह न्यूज,११ ऑगस्ट- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेची काही दिवसांपूर्वी घोषणा केली.त्यानिमित्ताने शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्र महिला सन्मान यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.या पार्श्वभूमीवर आज दि.११ ऑगस्ट रोजी नाशिकमध्ये महिला सन्मान यात्रेचे आयोजन शिवसेना महिला आघाडीच्या वतीने करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी श्रीमती श्यामल दीक्षित यांनी पुष्पगुच्छ देऊन शिवसेना नेत्या डॉ नीलम गोऱ्हे यांचा बैठकीत सत्कार केला.

या बैठकीत श्रीमती.पूजा वाघ व श्रीमती श्यामला दीक्षित यांनी बैठकीत आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उपस्थित महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून लाडकी बहिण योजेनेसह इतर योजनांचा आढावा डॉ.गोऱ्हे यांनी घेतला.

वडीलांच्या सोबतच आईचे नाव लावणारे एकमेव मुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे असे प्रतिपादन यावेळी डॉ.गोऱ्हे यांनी कार्यक्रमात केले.महिलांनी नकारात्मक गोष्टी टाळून सकारात्मक गोष्टीकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे असा सल्ला देखील डॉ.निलम ताई गोऱ्हे यांनी उपस्थित महिलांना दिला.

माझी लाडकी बहिण योजनेवर टीका होत असताना डॉ. निलम ताई गोऱ्हे यांनी विरोधकांना शेतकरी कर्ज माफी ही भीक होती का ? असा आक्रमक सवाल डॉ.गोऱ्हे यांनी विचाराला.

या कार्यक्रमाला श्रीमती पूजा वाघ संपर्क प्रमुख नाशिक, श्रीमती.श्यामला दीक्षित नाशिक जिल्हा समन्वयक,श्रीमती श्रद्धा जोशी नांदगाव – येवला जिल्हाप्रमुख, श्रीमती सुवर्णा मटाले,श्रीमती मंगला भास्कर,श्रीमती पूजा धुमाळ, श्रीमती अस्मिता देशमाने,श्रीमती मंदाताई जाधव, श्रीमती अंजली जोशी, श्रीमती संगीता लवंगे,श्रीमती पायल कुलकर्णी ,श्रीमती मृणाल कुलकर्णी यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top