हॉटस्पॉट दिला नाही म्हणून संतापलेल्या पतीने केली पत्नीची हत्या


murder knief
हरियाणाच्या रोहतकमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे, पत्निने पतीला हॉटस्पॉट दिला नाही म्हणून संतापलेल्या पतीने केली पत्नीची हत्या यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

 

आरोपी घरी होत आणि मोबाईल वापरत होता. यावेळी त्याच्या मोबाईलचे इंटरनेट गेले. त्यानंतर त्याने पत्नीला मोबाईलचा हॉट स्पॉट ऑन करण्यास सांगितले. यावर त्याच्या पत्नीने सांगितले की मी कामात आहे, नंतर देते.पत्नीचे हे उत्तर ऐकून पतीला राग आला व त्याने धारदार शस्त्राने तिची हत्या केली. यामध्ये महिलेला खोलवर जखमा झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला.

 

यानंतर आरोपी पती घरातून फरार झाला. रेखाच्या कुटुंबीयांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. या घटनेबाबत माहिती देताना बहू अकबरपूर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी म्हणाले की, हॉट स्पॉट चालू न केल्यामुळे पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना रोहतकच्या मदिना गावात समोर आली आहे. आरोपी पतीने रागातून ही घटना केल्याचे तपासात समजले आहे. पोलिसांनी आरोपी वर कारवाई करत त्याला मदिना गावातून अटक केली. या घटनेची माहिती गावातील लोकांना समजताच संपूर्ण गावात शोककळा पसरली.  पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील कारवाई सुरू आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top