पंढरपूर उपविभागात गुरुवारपासून महसूल पंधरवडा

पंढरपूर उपविभागात गुरुवारपासून महसूल पंधरवडा

पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.31:- पंढरपूर उपविभागात महसूल विभागाचा महसूल पंधरवडा 1 ते 15 ऑगस्टदरम्यान साजरा करण्यात येणार आहे.महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा आणि विभागांद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबत नागरिकांना अधिकाधिक माहिती प्राप्त होऊन त्यांना योग्य लाभ घेता यावा, तसेच त्याबाबत नागरिकांमध्ये जागरुकता वाढावी, शासन आणि शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृद्धिंगत व्हावा यासाठी विशेष मोहीम व लोकाभिमुख उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने महसूल पंधरवडा साजरा करण्यात येणार असल्याचे पंढरपूर विभागाचे प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी सांगितले.

या उपक्रमात दि.01 ऑगस्ट रोजी महसूल दिन साजरा करणे व महसूल सप्ताह प्रारंभ, मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना कार्यक्रमाचे स्वरूप,योजनेसाठी लागणारी कागदपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी विविध दाखले,प्रमाणपत्र वितरित करणे,दि.2 ऑगस्टला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा अधिकाधिक युवकांना लाभ देण्यासाठी विविध दाखल्यांसाठी शिबिरांचे आयोजन,दि.ऑगस्ट ला मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना या अनुषंगाने ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांना भेट देण्यासाठी नमूद केलेली कागदपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी शिबिरे, दि 4 ऑगस्टला स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय अंतर्गत कार्यालयामध्ये स्वच्छता मोहीम,दि.5 ऑगस्टला कृषी मार्गदर्शन कार्यक्रम,दि.6 ऑगस्टला शेती,पाऊस आणि दाखले,दि.7 ऑगस्टला युवा संवाद कार्यक्रम, दि.8 ऑगस्टला महसूल – जन संवाद,दि.9 ऑगस्टला महसूल ई-प्रणाली,दि.10 ऑगस्टला सैनिक हो तुमच्यासाठी, दि.11 ऑगस्टला आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन, दि.12 ऑगस्टला एक हात मदतीचा- दिव्यांगांच्या कल्याणाचा, दि. 13 ऑगस्टला महसूल अधिकारी व कर्मचार्यांचे प्रशिक्षण, दि.14 ऑगस्टला महसूल पंधरवडा वार्तालाप,दि.15 ऑगस्टला महसूल संवर्गातील कार्यरत व सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी संवाद,उत्कृष्ट अधिकारी व कर्मचारी पुरस्कार वितरणासह सांगता समारंभ होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top