स्वातंत्र्यदिनी तहसिल कार्यालय येथे शासकिय ध्वजारोहण संपन्न
प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजारोहणाचा शासकीय कार्यक्रम संपन्न
पंढरपूर, दि.15:- स्वातंत्र्याच्या 78 व्या वर्धापन दिनानिमित्त तहसिल कार्यालय येथे प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजारोहणाचा शासकीय कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे, तहसिलदार सचिन लंगुटे, गटविकास अधिकारी सुशिल संसारे, मुख्याधिकारी महेश रोकडे,नायब तहसिलदार बालाजी पुदलवाड,डि.एस.आसवले,निवडणुक नायब तहसिलदार वैभव बुचके,मंदिर समितीच्या सदस्या शंकुतला नडगिरे तसेच स्वातंत्र्य सैनिक,मान्यवर नागरिक,पदाधिकारी व अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी पंढरपूर पोलीस पथकाच्यावतीने मानवंदना देण्यात आली.

यावेळी स्वातंत्र्य औचित्य साधून उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांच्या हस्ते शहिद मेजर कुणाल गोसावी यांचे पिता मुन्नागिरी गोसावी यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला.

