भिंगे परिवार समाजोपयोगी उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याचे काम करत आहे-युवा नेते प्रणव परिचारक

विद्यार्थ्यांमध्ये बुद्धिबळाची आवड निर्माण व्हावी यासाठी आनंद राजेंद्र भिंगे मित्रपरिवाराकडून बुद्धिबळाचे वाटप

भिंगे परिवार समाजोपयोगी उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याचे काम करत आहे – युवा नेते प्रणव परिचारक

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – देशभरात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.पंढरपूरात सालाबादप्रमाणे 26 जानेवारी व 15 ऑगस्ट या सुवर्णदिनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारे सामाजिक उपक्रम भिंगे परिवाराकडून राबवले जातात.

नुकत्याच झालेल्या जागतिक महिला बुद्धिबळ स्पर्धेत महाराष्ट्राच्या कन्या दिव्या देशमुख यांनी सुवर्णपदक मिळवले. याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये बुद्धिबळाची आवड निर्माण व्हावी यासाठी बुद्धिबळाचे वाटप आनंद राजेंद्र भिंगे मित्रपरिवाराकडून करण्यात आले.

यावेळी युवा नेते प्रणव परिचारक यांनी 26 जानेवारी,15 ऑगस्ट या दिवशी भिंगे परिवार समाजोपयोगी उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याचे काम करत आहे असे विचार व्यक्त केले.

याप्रसंगी निलेश आंबरे,संजय भिंगे,विवेक भिंगे,मयूर भिंगे, अथर्व भिंगे,विजय भिंगे,लाला पानसकर, प्रसाद कळसे, श्रीनिवास बोरगावकर, युवराज मुचलंबे,सुरज वाघुले,शशिकांत गडकरी, शिवकुमार जवळे, संतोष ठिगळे, शुभम महाजन आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Back To Top