अंतराळात अडकलेल्या सुनीता विल्यम्स बद्दल नासाने दिली मोठी बातमी,स्टारलाइनर स्पेसशिपच्या थ्रस्टरची चाचणी पूर्ण


sunita Williams
नासाच्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बॅरी विल्मोर हे सुमारे दीड महिन्यांपासून अंतराळात अडकले आहेत. बोईंग स्टारलाइनरमधील बिघाडामुळे दोन्ही अंतराळवीर अद्याप परत येऊ शकलेले नाहीत. दरम्यान, अंतराळवीरांबाबत चांगली बातमी आली आहे. नासा आणि बोईंग अभियंत्यांनी स्टारलाइनर स्पेसशिपच्या थ्रस्टरची चाचणी पूर्ण केली आहे. परतीच्या प्रवासाची योजना बनवण्यासाठी नासा आणि बोईंग ही चाचणी पूर्ण होण्याची वाट बघत आहे.  

 

गेल्या आठवड्यात उशिरा प्रसिद्ध झालेल्या अद्यतनात असे म्हटले आहे की 'स्टारलाइनर रिॲक्शन कंट्रोल सिस्टम थ्रस्टरचे ग्राउंड टेस्टिंग न्यू मेक्सिकोमधील व्हाईट सँड्स टेस्ट फॅसिलिटीमध्ये पूर्ण झाले आहे. आता संघांचे लक्ष डेटा पुनरावलोकनावर आहे. अंतराळयान 5 जून रोजी सुनीता विल्यम्स आणि बॅरी विल्मोर यांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) घेऊन गेले. अंतराळवीरांची ही मोहीम केवळ आठ दिवसांची होती. बोइंग स्टारलाइनरचे हे पहिले उड्डाण होते. 

5 जून रोजी सुनीता विल्यम्स आणि बॅरी  विल्मोर हे स्टायलाइनर अंतराळयानातून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर गेले. आठवड्याभरानंतर ते दोघे काम आटपून परतणार होते. मात्र अंतराळ यानात हेलियमची गळती आणि थ्रस्टरच्या बिघाडामुळे त्यांचा परतीचा प्रवास पुढे ढकलण्यात आला. 

गेल्या दीड महिन्यांपासून ते दोघे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर थांबले आहे. ते यानामधील बिघाड दूर करण्यात व्यस्त होते. या महिन्याच्या अखेरीस त्यांचा परतीचा प्रवास होऊ शकतो असे नासा आणि बोईंग ने म्हटले आहे.   

Edited By- Priya Dixit 

 

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top