मंगळवेढा पोलीस ठाण्यात मुढवी येथे माण नदीचे पात्रातील अवैध वाळू उपश्याचा गुन्हा दाखल
4,00,000/- रू किमतीचे अशोक लेलंड कंपनीचा दोस्त व 5100/-अंदाजे एक ब्रास वाळु जप्त
मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज- मंगळवेढा पोलीस ठाण्यात मुढवी येथे माण नदीचे पात्रातील अवैध वाळू उपश्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेली हकिकत अशी की , दि. 30/05/2025 रोजी ०३.४६ वा.चे सुमारास मुढवी ता मंगळवेढा जि.सोलापूर येथे माण नदीचे पात्रातुन अशोक लेलंड कंपनीचा 4,00,000/- रू किमतीचे अशोक लेलंड कंपनीचा दोस्त त्याचा आरटीओ नं. MH13 AN7503 व चेसी नं. MB1AA22E5DRW49955 गाडीवरील चालक यांनी त्याचे ताब्यातील अशोक लेलंड कंपनीचा दोस्त मध्ये माण नदीपात्रातील 5100/-अंदाजे एक ब्रास वाळुचे उत्खनन करुन सदर वाहनाचे पाठीमागील हौदात भरुन शासकिय गौण खनिज वाळु विनापरवाना,बेकायदेशीरित्या चोरुन भरून घेवुन जात असताना त्याला पोलीसांची चाहुल लागताच वाहन तेथेच सोडुन पळुन गेला आहे.

त्यामुळे अशोक लेलंड कंपनीचा दोस्त वरील अज्ञात चालक यांच्या विरूध्द BNS 303(2),सह पर्यावरण संरक्षण अधि कलम 9,15 प्रमाणे कायदेशीर फिर्याद पोहेकाँ मनोज खंडागळे वय-42 वर्षे नेमणूक-मंगळवेढा पोलीस ठाणे यांच्याकडून देण्यात आली आहे.अशा मजकुराची फिर्याद दिल्याने अज्ञात चालका विरुध्द गुन्हा रजि. दाखल करून गुन्ह्याचा वर्दी रिपोर्ट मा.हु. कोर्ट सो.यांना पाठविण्याची तजविज ठेवण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक यांच्या आदेशान्वये पो.ना.श्री.दुधाळ यांचेकडे दिला आहे म्हणुन पो.हे.कॉ.श्री. हाके म्हणून नोंद दाखल केली आहे.
