शरद पवार एकनाथ शिंदे भेट, आरक्षण वादावर सर्वपक्षीय बैठक बोलवण्यावर दोघांची सहमती


Maratha Vs OBC Reservation
राज्यात सध्या मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापला आहे.या मुद्द्यावरून सध्या मराठा आणि ओबीसीं समाजाच्या नेत्यांमध्ये मतभेद आहे. सोमवारी शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृहात झाली. तासभरबंद खोलीच्या आत  चालणाऱ्या या बैठकीमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली. बंद खोलीच्या आत दोन्ही नेत्यांमध्ये 20 मिनिटे चर्चा झाली.  

शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणामुळे राज्यातील तणावाला निवळण्यासाठी मार्ग काढण्यासाठी मराठा आणि ओबीसी समाजाच्या प्रतिनिधींसोबत सर्वपक्षीय बैठक बोलावण्याचे मान्य केले. अशी माहिती सूत्रांनी दिली. 

अलीकडेच अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर शरदपवारांची  भेट घेतली. सध्या महाराष्ट्राची परिस्थिती अत्यंत बिकट असल्याचे ते म्हणाले. 

Edited By- Priya Dixit 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top