आयएएस पूजा खेडकर यांच्या वडिलांनी समोर येऊन प्रकरणावर प्रतिक्रिया दिली


Photo Courtesy X

ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहे.या प्रकरणात त्यांना प्रशिक्षण स्थगित करून 23  जुलै पर्यंत मसुरीच्या लालबहादूर शास्त्री अकादमीत परत बोलवले आहे. 

या प्रकरणाच्या दरम्यान पूजा खेडकर यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांवर छळ करण्याचा आरोप केला. पूजाची आई मनोरमा खेडकर यांना पिस्तुलाचा धाक दाखवत शेतकऱ्यांना धमकवल्याबद्दल नोटीस बजावली असून या प्रकरणानंतर पूजाचे आई वडील नॉट रिचेबल झाले. 

आता पूजाचे वडील दिलीप खेडकर हे समोर आले असून त्यांनी या प्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

दिलीप खेडकर म्हणाले, या सर्व प्रकरणात त्यांच्या विरोधातील राजकीय कटकारस्थान असल्याचा आरोप त्यांनी केला. 

माझ्या मुलीने कोणतेही चुकीचे गैरवर्तन केले नाही. तिचा छळ करण्यात आला. हे सर्व माझ्या मुलीच्या विरोधात कटकारस्थान केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 

नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्रा बाबत ते म्हणाले, जर या व्यवस्थेत पैशाचा वापर झाला असता तर  प्रशासकीय सेवेत एक ही गरीब आला नसता.नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र नियमानुसार काढण्यात आले. असे पूजाचे वडील दिलीप खेडकर म्हणाले.   

 

Edited by – Priya Dixit   



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top