प्रणिती ताई भालके यांनी अधिकाऱ्यांना फोन करून त्यावर मार्ग काढला

संभाजी चौक येथील दर्शन बारी ही व्यापाऱ्यांच्या दुकानाला आडवी येत होती

पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज –आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूर येथे भाविक मोठ्या संख्येने श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी आलेले आहेत.दर्शन रांग गोपाळपूरच्या पुढे गेलेली आहे.

संभाजी चौक येथील दर्शन बारी ही व्यापाऱ्यांच्या दुकानाला आडवी येत होती. त्यामुळे व्यापाऱ्यांचे खुप नुकसान होत होते. तेथे जाऊन प्रणिती ताई भगिरथ भालके यांनी अधिकाऱ्यांना फोन करून त्यावर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केला.

प्रणितीताई भगिरथ भालके यांनी बोलताना सांगितले की व्यापार्यांनी आषाढी वारीसाठी कर्ज काढून माल भरला आहे.वारीही चांगली भरलेली आहे मात्र या दर्शन बारीमुळे व्यापार्यांना अडथळा निर्माण होत होता. यामुळे प्रशासनाला संपर्क साधला आणि समन्वयाने मार्ग मोकळा केला आहे.

त्यामुळे व्यापारी आता खुश असून व्यापाऱ्यांनी प्रणितीताई भगिरथ भालके यांचे आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top