सार्वजनिक शौचालयाच्या सेफ्टी टॅंकमध्ये देशी गाई पडल्यामुळे अडकली नागरिकांच्या प्रयत्नातून सुखरूप सुटका
फलटण/ ज्ञानप्रवाह न्यूज – फलटण शहरातील दत्तनगर भागामध्ये असलेल्या सार्वजनिक शौचालयाच्या सेफ्टी टॅंकमध्ये देशी गाई पडल्यामुळे अडकली होती.सदरची बाब स्थानिक रहिवाशांनी लक्षात आल्यानंतर गाईला वाचवण्याची प्रयत्न सुरू करण्यात आले.
राहुल पवार,उमेश मोहिते,शशिकांत कदम, रवी तारे आदी प्रयत्न करत होते मात्र यश येत नव्हते.राहुल पवार यांनी फलटण शहर भाजपा अध्यक्ष अनुप शहा संपर्क साधला. अनुप शाह यांनी तातडीने येत जेसीबी बोलावला.
तत्पूर्वी नवरात्र मंडळाचे कार्यकर्ते,स्थानिक नागरिक यांनी वासा बांबू दोरी याचा वापर करत गाईला बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केले आणि जेसीबी येईपर्यंत गाईला बाहेर काढण्यात यश मिळाले.
स्थानिक नागरिकांनी अनेकदा तक्रार करून सुद्धा सदरचा सेफ्टी टँक बंदिस्त करण्यात आले नव्हते त्यामुळे हा दुर्दैवी प्रसंग घडला. एक छोटा मुलगा या सेफ्टी टॅंक मध्ये पडला होता तरीसुद्धा नगरपरिषदेकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे आता तरी नगरपरिषद या बाबींकडे लक्ष देईल का असा प्रश्न यांनी विचारला असून लक्ष घातले नाही तर लवकरच जन आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजपचे शहराध्यक्ष अनुप शहा यांनी दिला आहे.