बृहन्मुंबई आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचा उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी घेतला आढावा
नागरिकांच्या मदतीसाठी प्रत्येक स्थानकावर हेल्प डेस्क उभारा- डॉ.नीलम गोऱ्हे
मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज,८ जुलै २०२४- मुंबईत सर्वत्र मुसळधार पाऊस झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर,बृहन्मुंबई आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचा उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आढावा घेतला.
महानगरपालिकेची सर्व यंत्रणा मुंबईकरांच्या सेवेसाठी सुसज्ज असून आपत्कालीन नियंत्रण कक्षासह आपत्कालीन कर्मचारी व अधिकारी वर्ग विविध ठिकाणी उपस्थित असल्याचं आढावा बैठकीत अधिकाऱ्यांनी सांगितलं.मुंबई शहरात १२० स्वयंचलित हवामान केंद्र आहेत त्यामुळे हवामानाची वास्तविक वेळेत माहिती मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.आपत्ती काळामध्ये मुंबई महानगरपालिका एनडीआरएफ व अग्निशमन दलाची वेळोवेळी मदत मिळत असल्याचे सांगत 1916 या हेल्पलाईन क्रमांकाचा वापर करण्याचे आवाहन केले.
यावेळी मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या मुख्याधिकारी श्रीमती रश्मी लोखंडे आणि प्रादेशिक हवामान केंद्राचे डेप्युटी डायरेक्टर जनरल सुनील कांबळे यांनी उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांची भेट घेतली.
आपत्ती काळात गरजू नागरिकांनी कुठे आसरा घ्यावा याची माहिती विविध समाज माध्यमांवर कळवावी. अशा परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी प्रत्येक लोकल स्थानकावर हेल्प डेस्क करण्यात यावा अशा सूचना उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी यावेळी दिल्या.