आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरचे मुख्याधिकारी डॉ.प्रशांत जाधव यांनी घेतली श्री संत ज्ञानेश्वर महाराज व तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रमुखांची भेट
पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२८/०६/२०२४ – पंढरपूर मध्ये येत्या १७ जुलै २०२४ रोजी आषाढी यात्रा भरत असून या आषाढी यात्रेमध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात भाविक पंढरपूरमध्ये दाखल होणार आहेत .पंढरपूरमध्ये येणाऱ्या भाविकांना चांगली सेवा सुविधा मिळावी त्या दृष्टीने पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व प्रशासक तथा प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष प्रयत्न करण्यात येत असून ज्या ठिकाणी मानाच्या पालख्या उतरल्या जातात त्या वाखरी पालखी तळ , 65 एकर भक्ती सागर,पत्रा शेड दर्शन बारी,शहर उपनगरात विविध सेवासुविधा देण्यात येणार आहेत.

परंतु आषाढी यात्रा मध्ये मानाच्या पालख्या त्यासोबत लाखो भाविक श्री विठ्ठल रुक्मिणी च्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये येत असतात. या पालख्यांना चांगल्या सेवा सुविधा द्याव्यात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये म्हणून नगरपरिषदेच्या वतीने विशेष प्रयत्न केले जात आहेत.
याच पार्श्वभूमीवर प्रथमच पंढरपूर नगर परिषद मुख्याधिकारी डॉ.प्रशांत जाधव यांनी आळंदी येथे जाऊन श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख योगी निरंजननाथ व देहू येथे जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख माणिक महाराज मोरे यांची समक्ष भेट घेऊन पालखी सोहळ्यासाठी काय काय सेवा सुविधा देता येतील किंवा काही अडचणी असतील तर त्याबाबत चर्चा करण्यात आली.

या चर्चेमध्ये ज्यावेळेस पालखी पंढरपूर मध्ये दाखल होतील त्यावेळेस त्या पालख्या ज्या मठामध्ये विसावतात त्या ठिकाणी नगरपालिकेच्या वतीने स्वच्छता, पाण्याचे टँकर, घंटागाडी वीज व्यवस्था सर्व सेवासुविधा मिळाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केल्या.त्यानुसार पालखी प्रमुखांना कोणतीही अडचण येणार नाही या दृष्टीने नगरपरिषद प्रयत्नशील राहील असे आश्वासन यावेळी डॉ.प्रशांत जाधव यांनी पालखी प्रमुखांना दिले आहे.

यावेळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या वतीने योगी निरंजननाथ व श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज संस्थान यांच्यावतीने माणिक महाराज मोरे व वृक्षदायी संघटनेचे अध्यक्ष शिवाजी महाराज मोरे, रणजीत मोरे यांनी डॉ.प्रशांत जाधव यांचा सत्कार केला व पहिल्यांदाच पंढरपूर नगरपालिकेच्या वतीने मुख्याधिकारी यात्रेपूर्वी पालखी सोहळा प्रमुखांना भेटून अडचणी समजून घेण्यासाठी आळंदी व देहू येथे आल्याबद्दल संस्थान च्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले व पालखी सोहळा प्रमुख सुद्धा नगरपरिषदेला निश्चितपणाने चांगले सहकार्य राहील असे आश्वासन यावेळी पालखी सोहळा प्रमुख यांनी दिले.