खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडून सोलापूर शहरातील नाले सफाई आणि पावसामुळे घरात पाणी शिरलेल्या परिसराची पाहणी आणि महानगरपालिका प्रशासनाला तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना

सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.११ जून २०२४- गेल्या चार पाच दिवसांपासून पडत असलेल्या सततच्या पावसामुळे आणि नाले सफाई अर्धवट झाल्यामुळे शहरातील अनेक नागरिकांच्या व रहिवाश्यांच्या घरांमध्ये आणि दुकानांत पाणी शिरून नागरिकांचे अहोरात्र बेहाल होत आहेत.

त्याची गांभीर्याने दखल घेऊन खासदार प्रणिती शिंदे यांनी शहरातील मोदी नाला, पटवर्धन चाळ नाला, कारंबा नाला, कुंभार वेस नाला व इत्यादी भागात असलेल्या नाले सफाई ची आणि मोदी, जगजीवन राम झोपडपट्टी, भैरु वस्ती, पटवर्धन चाळ, २नंबर झोपडपट्टी, निराळे वस्ती आदी भागातील घरात पाणी शिरलेल्या परिसराची पाहणी केली.
यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर महानगरपालिका अधिकाऱ्यांना तात्काळ नाले सफाई, ड्रेनेज दुरुस्ती, पावसाळी पाण्याचा निचारा करण्यासाठी तात्काळ काम सुरू करण्याची सूचना केली.

यावेळी सोलापूर कॉंग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे,अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, संजय हेमगड्डी, बाबा मिस्त्री, मनोज यलगुलवार, विनोद भोसले, देवा गायकवाड, आशाताई म्हेत्रे, गणेश डोंगरे, अंबादास बाबा कऱगुळे, बाबुराव म्हेत्रे, तिरुपती परकीपंडला, युवराज जाधव,सुभाष वाघमारे,दिनेश डोंगरे,चंदू नाईक, राजू निलगंटी, शिवा म्हेत्रे, वेदमूर्ती म्हेत्रे, राजू दिवटे, यासीन शेख, समीर शेख यांच्यासह सोलापूर महानगर पालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
