सोलापूर – महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या अभियांत्रिकी सेवा परीक्षा २०२३ चा निकाल आज जाहीर झाला.
वैष्णवीचे प्राथमिक शिक्षण नु म वि शाळेत, माध्यमिक शिक्षण दमाणी विद्या मंदिर तर अभियांत्रिकी शिक्षण ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयातून झाले आहे. अभियांत्रिकी प्रथम वर्षी दि बाटू विद्यापीठ मध्ये प्रथम आली होती. मराठा सेवा संघाचे राम गायकवाड यांची कन्या आहे. वैष्णवी ने मिळवलेल्या यशाचे सर्वत्र स्वागत आणि अभिनंदन करण्यात येत आहे.
