नांदेड- नांदेड जिल्हा अभिवक्ता संघाने जिल्हा नांदेड जिल्हा न्यायालयात परशुराम जन्मोत्सव संपन्न. अशा कार्यक्रमामुळे सर्व एकत्र येऊन विचाराची देवाण-घेवाण होते– प्रमुख जिल्हा न्यायाधीश वेदपाठक न्यायालयात श्री भगवान परशुराम जन्मोत्सवाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख जिल्हा न्यायाधीश सुनील वेदपाठक अध्यक्ष भाषणात म्हणाले असे विविध महापुरुषांच्या उत्सवाचे कार्यक्रम घेतले म्हणजे सर्व एकत्र येऊ शकतोत व त्यामुळे विचाराची देवाण-घेवाण होऊ शकते.
श्री भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त नांदेड जिल्हा अभियंता संघाने जिल्हा न्यायालयात छोटेखानी जन्मोत्सव साजरा केला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख जिल्हा न्यायाधीश सुनील वेदपाठक होते, तर प्रमुख वक्ते म्हणून अॅड. व्यंकटेश पाटणूरकर होते. व्यासपीठावर जिल्हा सरकारी वकील अॅड. रणजीत देशमुख, नांदेड जिल्हा अभिवक्ता संघाचे जिल्हाध्यक्ष अशिष गोधमगावकर, अॅड. भोसले ,अॅड. बाबुळगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. भगवान परशुरामाच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविकात अॅड. गजानन पिंपरखेडकर म्हणाले अशा कार्यक्रमातून संस्कृतीची देवाण-घेवाण होते व महापुरुषांच्या विचाराचे असलेले समज- गैरसमज दूर होतात .त्यामुळे हा परशुराम जन्मोत्सवाचा छोटेखानी कार्यक्रम आज साजरा होत आहे. प्रमुख वक्ते अॅड. व्यंकटेश पाटणूरकर यांनी श्री भगवान परशुरामाचा जन्मोत्सव न्यायालयात साजरा होण्याची ही पहिली वेळ आहे. त्यामुळे सर्वप्रथम त्यांनी नांदेड अभियोक्ता संघाचे जिल्हाध्यक्ष अॅड. अशीष गोधमगावकर व त्यांच्या टीमचे अभिनंदन केले. भगवान परशुराम हा विष्णूचा सहावा अवतार असून विष्णूला परशुरामाचा अवतार घेण्याचे कारण काय यावर पाटणूरकर यांनी सविस्तर सांगितले. तसेच परशुराम हा एका समाजासाठी नाही व परशु मुळे त्यास परशुराम मानले जाते .कोकणाची निर्मिती भगवान परशुराम यांनी केली. कोकणात पूर्ण समुद्र होता, त्यावेळेस परशुरामाने आपल्या ताकतीने तो समुद्र नाहीसा करून तेथे कोकणाची भूमी निर्माण केली.परशुराम ब्राह्मण असल्यामुळे त्यास सर्व वेद पाठ होते तर क्षत्रिय असल्यामुळे सर्व शस्त्राचे ज्ञान होते.या वर्षी ज्याप्रमाणे परशुराम जन्मोत्सव साजरा झाला तसाच प्रत्येक वर्षी साजरा केलाच पाहिजे असे विचार त्यांनी व्यक्त करून शेवटी ते म्हणाले आज सर्वांनी परशु वापरण्याची परिस्थिती आहे. अॅड. अशिष गोधमगावकर यांनी आपले विचार व्यक्त करताना म्हणाले सर्व समाजातील महापुरुषांचे सोहळे साजरे करून त्यांचे चांगले जे आहे ते आपण घ्यावे. हा जन्मोत्सवाचा कार्यक्रम घेण्याचा पहिला प्रसंग आहे. मोठा कार्यक्रम घ्यायचा होता पण पहलगाम येथील हल्यामुळे तो कार्यक्रम रद्द करून या उत्सवासाठी जमा झालेला निधी पंतप्रधान निधी संकलनास दिला. अशी माहिती नांदेड जिल्हा अभिवक्ता संघाचे व कार्यक्रमाचे संयोजक अॅड. आशिष गोधमगावकर यांनी दिली. अध्यक्षीय भाषणात प्रमुख जिल्हा न्यायधीश सुनील वेदपाठक यांनी येथील अधीवक्ता संघाचे कौतुक करून संघ प्रत्येक कार्यक्रम घेतात हे वाखण्यासारखे आहे, असे ते म्हणाले. व पुढील प्रत्येक महापुरुषाचे व इतर कार्यक्रम आपण घेऊन सहभाग देत जावा. असे कार्यक्रम इतर न्यायालयात माझ्या कार्यकालात मी बघितले नाही. असेही त्यांनी सांगितले. परशुरामाच्या जीवनाचे सगळे पैलू सांगण्यासाठी खूप वेळ लागतो ,त्यामुळे ते सर्व पैलू आपण पुढील एखाद्या कार्यक्रमात घेऊ. व अशा सामुदायिक उत्सवामुळे, कार्यक्रमामुळे सर्व एकत्र येऊ शकतोत व त्यातून विचाराची देवाण-घेवाण होऊ शकते असे विचार न्यायमूर्ती वेदपाठक यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. वृषाली जोशी यांनी केले. तर आभार प्रदर्शन अॅड. उमेश मेगदे यांनी केले. या जन्मोत्सव कार्यक्रमास मोठ्या प्रमाणावर विधिज्ञ उपस्थित होते.
