नांदेड येते चिकित्सा शिविर संपन्न —सुप्रसिद्ध डॉ बी आर. मालू यांची महितीं

नांदेड (अनंतोजी कालिदास)खालसा सृजना दिवस बैसाखी पर्वास समर्पित, गुरुद्वारा सचखंड बोर्ड नांदेड, सीख वेलफेअर असोसिएशन नांदेड, रोटरी क्लब नांदेड, जिल्हा रुग्णालय नांदेड तसेच श्री शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २० एप्रिल रोजी दसमेश हाॅस्पिटल, नांदेड येथे एक भव्य रोगनिदान शिबिर, मधुमेह निदान शिबिर व गर्भाशयाच्या कर्करोगाचे निदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. जिल्हा शल्य चिकित्सक श्री निलकंठ भोसीकर यांनी शिबिरास भेट देऊन, येथे करण्यात आलेल्या व्यवस्थेचे कौतुक केले तसेच या हाॅस्पिटल साठी जिल्हा रुग्णालयातर्फे सर्वोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या शिबिरात रुग्णांनी सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत आपली तपासणी करून घेऊन या शिबिराच्या लाभ घेतला. तत्पूर्वी सीख वेलफेअर असोसिएशन नांदेड, चे अध्यक्ष सरदार लड्डू सिंग महाजन यांनी प्रस्तावना सादर करीत हे शिबिर आयोजनासाठी गुरुद्वारा सचखंड बोर्ड नांदेड, रोटरी क्लब नांदेड, जिल्हा रुग्णालय नांदेड तसेच श्री शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय नांदेड यांच्या तर्फे करण्यात आलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद व्यक्त केले.
गुरुद्वारा तखत सचखंड श्री हजुर अबचल नगर साहेब नांदेड चे सहायक जत्थेदार संत बाबा राम सिंघ जी यांच्या हस्ते या शिबिरात नि:शुल्क सेवा दिल्याबद्दल खालील डाॅक्टरांचा सत्कार करण्यात आले.
ऱ्हदयरोग तज्ज्ञ: डॉ परमिंदर सिंघ कुमार व डॉ साईनाथ हिवराळे, जनरल फिजीसियन: डॉ बी.आर. मालू, डॉ सौ. शुभांगी पतंगे, डॉ सौ. रेणुका अग्रवाल, डॉ गणेश पावडे, स्त्री रोग तज्ज्ञ: डॉ सौ. गायत्री वाडेकर, डॉ सौ. सोनल बिसेन, डॉ प्रियंका पावडे, बालरोग तज्ज्ञ: डॉ सुधीर कोकरे, डॉ रितेश बिसेन, नाक कान घसा तज्ज्ञ: डॉ संजय पतंगे, डॉ अश्विन लव्हेकर, अस्थिरोग तज्ज्ञ: डॉ नितीन शेटे, दंत रोग तज्ज्ञ: डॉ सुरेश दागडिया, डॉ मधुरा जेठलीया, डॉ तेजपालसिंघ लालसिंघ, डॉ. गुरजीतकौर तेजपालसिंघ.
हे शिबिर आयोजन करण्यासाठी शिख वेल्फेअर असोसिएशन नांदेडचे अध्यक्ष स. लड्डू सिंघ महाजन, सचिव स. नारायण सिंघ नंबरदार, रोटरी क्लब नांदेडचे अध्यक्ष डॉ संजय पतंगे आणि सचिव रो.सुरेश अंबुलगेकर व प्रोजेक्ट डायरेक्टर रो.सुरजीतसिंघ खालसा यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top