धर्माबाद/(अनंतोजी कलिदास)
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने संघटनात्मक बदल करताना धर्माबाद तालुक्याला धर्माबाद ग्रामीण मंडळ अध्यक्षपदी गुलाबराव पाटील मोरे तर धर्माबाद शहर मंडळ अध्यक्षपदी चक्रेश पाटील बन्नाळीकर यांची निवड करण्यात आली.
आ. राजेश पवार यांच्या उपस्थितीत दि. २० एप्रिल रोजी निवड प्रक्रिया पार पडली. तालुका
अध्यक्ष निवडीची प्रक्रिया भाजपच्या संपर्क कार्यालयात पार पडली असून जिल्हा सरचिटणीस यांनी निवडीची घोषणा केली. धर्माबाद तालुक्यातील जबाबदारी गुलाबराव मोरे तर शहरांची जबाबदारी अॅड. चक्रेश यांच्यावर सोपवण्यात आली. यावेळी आमदार राजेश पवार, सौ. पूनम पवार यांच्यासह भाजपाचे ज्येष्ठ नेते तरुण कार्यकर्ते यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होते.