पंढरपुर शहरातील सराईत वाळू तस्कर धोकादायक व्यक्ती विकी उर्फ विकास मेटकरी एम.पी.डी.ए कायद्यांर्गत एका वर्षासाठी येरवडा कारागृह येथे स्थानबध्द….
पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१२/०४/२०२५- पंढरपूर शहर पोलीस ठाणे हद्दीत अवैधपणे वाळू उपसा करून ती बेकायदेशीरपणे विक्री व्यवसाय करणारा वाळु तस्कर तसेच शरीरा विषयक गुन्हे करणारा सराईत गुन्हेगार विकी उर्फ विकास मधुकर मेटकरी रा.देवकते मळा, पंढरपूर जि.सोलापुर हा अवैधरित्या वाळु चोरी करणे,ती विक्री करणे सोयीचे व्हावे या करीता दहशत माजवण्याकरीता अवैध वाळूचे कारणावरून जीवघेणे हल्ले करणे तसेच पंढरपूर शहर व पंढरपूर शहरा लगतच्या परीसरातील लोकांना दमदाटी, मारहाण करून गौण खनिज (वाळु) चोरी करणे असे गुन्हे करण्याची त्यास सवय होती जे की,भारतीय न्याय संहिता २०२३ मधीत प्रकरण ६ व १७ मधील अपराधी स्वरूपाची कृत्ये असून सदरची कृत्ये करण्याची त्यास सवय जडली होती. एक धोकादायक व्यक्ती म्हणुन त्याने स्वतःला सिध्द केले होते.
त्याचे विरुध्द अनेकवेळा अवैध वाळू व्यवसायाशी संबंधित तसेच शरीराविषयी गुन्हे दाखल होवुन त्यामध्ये अटक करण्यात आली होती परंतु त्याने सदर गुन्ह्यात जामीन मिळवुन अवैध वाळु व्यवसाय अव्याहतपणे सुरूच ठेवला होता. त्यांनतरही त्याचेवर पंढरपुर शहर पो.ठाणे गुरनं ८१/२०२५ भादवि कलम ११८,३५२,३५१,३ (५) वगैरे प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता तरीही तो कायद्याला जुमानत नव्हता.म्हणुन सराईत वाळु तस्कर गुन्हेगार विकी उर्फ विकास मधुकर मेटकरी रा.देवकते मळा,पंढरपूर जि.सोलापुर याचेविरूध्द पंढरपूर शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी महाराष्ट्र झोपडपट्टी दादा,हातभट्टी व औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती, द्रकश्राव्य कलाकृतींचे विनापरवाना प्रदर्शन करणारे व्यक्ती,अत्यावश्यक वस्तुंचा काळाबाजार करणारे व्यक्ती, वाळू तस्कर यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणे विषयीचा कायदा सन १९८१ मधील कलम ३(१) अन्वये स्थानबध्द करणेबाबतचा प्रस्ताव पोलीस अधिक्षक सोलापुर ग्रामीण यांचे मार्फतीने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सोलापुर यांना पाठविण्यात आला होता. त्या अनुशंगाने स्थानबध्दतेचे कामकाज चालवुन त्यांनी एम.पी.डी.ए कायद्यांर्गत स्थानबध्दतेचे आदेश पारीत केल्याने त्यास ताब्यात घेवुन येरवडा मध्यवर्ती कारागृह पुणे येथे एक वर्षाकरीता स्थानबध्द करण्यात आले असून पंढरपूर शहरातील वाळु तस्कर व शरीरा विषयीचे गुन्हे करणारे व गुन्हेगारी पार्श्वभुमी असणारे गुन्हेगारांवर अशा प्रकारची कारवाई करणेची प्रक्रिया चालु आहे.
सदरची कामगीरी ही सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधिक्षक प्रितमकुमार यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.अर्जुन भोसले पंढरपूर विभाग,पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर स्थानिक गुन्हे शाखा,वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरपूर शहर पोलीस ठाणे विश्वजीत घोडके यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि आशिष कांबळे, सपोफौ कल्याण ढवणे, शरद कदम, सचिन इंगळे,सुरज हेंबाडे,सचिन हेंबाडे,प्रसाद औटी, विनय कांबळे,सुनिल बनसोडे, समाधान माने,शहाजी मंडले, बजरंग बिचुकले,निलेश कांबळे,अनिस शेख तसेच सायबर सेलचे रतन जाधव यांनी केली आहे.
