26 एप्रिल ते 30 एप्रिल शिवजागर व शिवकिर्तन स़ोहळा
धर्माबाद (अनंतोजी कालिदास)
धर्माबाद तालुक्यातील महात्मा बसवन्ना हिल्स येथे वीरशैव लिंगायत समाज व सार्वजनिक महात्मा बसवेश्वर उत्सव समिती धर्माबाद आयोजित सार्वजनिक अखंड शिवनाम सप्ताह व परमरस्य पारायण व महात्मा बसवेश्वर जयंती महोत्सवाचे आयोजन दिनांक 23 4 2025 रोजी सुरुवात होत असून ह्या कीर्तन सप्ताहची सांगता दिनांक 30 4 2025 रोजी जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंती महोत्सवाने होणार आहे.
सात दिवस चालणाऱ्या अखंड शिवनाम सप्ताहाला महाराष्ट्रासह कर्नाटक व तेलंगानातील अनेक वंदनीय शिवाचार्य महाराजांची उपस्थिती लाभणार असून त्यामध्ये सदगुरु शिवानंद शिवाचार्य महाराज तमलूरकर, सदगुरु सोमलिंग शिवाचार्य महाराज बिचकुंदेकर, सदगुरु सिद्धदयाळ शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर ,सदगुरु वीरूपक्ष शिवाचार्य महाराज मुखेडकर, सदगुरु दिगंबर शिवाचार्य महाराज वसमतकर, सदगुरु महादेव स्वामी शिवाचार्य महाराज वाईकर ,
युवा संत राजशेखर शिवाचार्य महाराज अहमदपूरकर व सदगुरु व्यंकटस्वामी पिंपळगाव,सदगुरू नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज पूर्णा ,गुरुवर्य मल्लय्या स्वामी मठ संस्थान वाणी जवळा, वेदमूर्ती बसवराज महाराज चिंचोलीकर, लक्ष्मण स्वामी आप्पा हंगिरगा, शिवदासीबाई शिवटेकडी या गुरुवर्यांची उपस्थिती लाभणार असून कीर्तनरूपी सेवेमध्ये शिवभक्ती परायण विकास महाराज भुरे, शिवभक्ती परायण स्वातीताई दाबशेटकर, शिवभक्ती परायण शिवानी ताई वसमते, दयानंद महाराज देवर्जनकर, ब्रह्माकुमारी पूजा दीदी मुदखेड, मोहनराव कावडे गुरुजी हसनाळीकर, त्र्यंबक स्वामी नंदगावकर यांची उपस्थिती लाभणार असून या शिवनाम सप्ताहाला महाराष्ट्र आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील व पंचक्रोशीतील सर्व भजनी मंडळे व शिवभक्त मंडळी उपस्थित राहणार आहेत. जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांच्या जयंती महोत्सवानिमित्त भव्य रक्तदान शिबिर दिनांक 29 4 2025 रोजी घेण्यात येणार आहे
दिनांक 30 4 2025 बुधवारी सकाळी नऊ वाजता ध्वजारोहण सकाळी दहा वाजता मोटरसायकल रॅली दुपारी दोन वाजता महाप्रसाद आणि भव्य अशी शोभायात्रा सायंकाळी चार वाजता महात्मा बसवन्ना हिल्स येथुन महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याची भव्यदिव्य रथावरून मिरवणूक निघणार आहे .
या सात दिवसाच्या कार्यक्रमाला धर्माबाद तालुक्यातील व पंचक्रोशीतील हजारो शिवभक्तांनी उपस्थित राहण्याचे आव्हान सकल वीरशैव लिंगायत समाज व सार्वजनिक महात्मा बसवेश्वर उत्सव समिती बसवण्णा हिल्स धर्माबाद यांनी केले आहे.