Mumbai News: भारतीय रिझर्व्ह बँकेचा ९० वा स्थापना दिन मंगळवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा केला जाईल. यानिमित्ताने, राष्ट्रपती मुर्मू सोमवारी मुंबईत पोहचल्या.
मिळालेल्या माहितनुसार रिझर्व्ह बँकेचा ९० वा स्थापना दिन मंगळवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा केला जाईल. यानिमित्ताने, राष्ट्रपती मुर्मू सोमवारी एक दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर असणार. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी त्यांचे स्वागत केले.
ALSO READ: काश्मीरला मिळाली पहिली वंदे भारत ट्रेन भेट, पंतप्रधान मोदी १९ एप्रिल रोजी हिरवा झेंडा दाखवणार
स्वागत समारंभात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, पर्यटन आणि अन्न मंत्री शंभूराज देसाई, मुख्य सचिव सुजाता सौनिक, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला आणि इतर मान्यवर उपस्थित होते. नंतर राष्ट्रपती मुर्मू राजभवनाला रवाना झाल्या.
ALSO READ: गॅस गळतीमुळे लागलेल्या भीषण आगीत दोन अल्पवयीन भावंडांचा मृत्यू
Edited By- Dhanashri Naik