मारापूर येथील दलित वस्ती समाज मंदिराच्या बांधकामाचे लोकनियुक्त सरपंच विनायक यादव यांच्या हस्ते भूमिपूजन
मारापूर/ज्ञानप्रवाह न्यूज – डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत ग्रामपंचायत मारापूर येथील निधी मंजूर झालेल्या दलितवस्ती समाज मंदिराचे भूमिपूजन लोकनियुक्त सरपंच विनायक यादव यांच्या हस्ते व ग्रामपंचायत पदाधिकारी यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये तथागत गौतम बुद्ध व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन तसेच श्रीफळ फोडून करण्यात आले. दलित वस्ती भौतिक सोयी- सुविधांच्या अनुषंगाने या भागा मध्ये समाज मंदिर उभारण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत होती.

या मागणीसाठी आमदार समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली व लोकनियुक्त सरपंच विनायक यादव यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत प्रशासनाने संबंधित विभागाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून सदर दलित समाज मंदिरासाठी निधी मंजूर करून घेतला आहे.
या विकास कामाचे भूमिपूजन केल्यानंतर लोकनियुक्त सरपंच विनायक यादव यांनी सांगितले की,भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारक आणि लोकाभिमुख विचारांशी एकरूप होऊन सार्वजनिक जीवनामध्ये समाजकारण आणि राजकारण करत असताना मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांची विकासात्मक दृष्टी समोर ठेवून आम्ही ग्रामपंचायत सत्तेत आल्या पासून जनतेच्या धोरणात्मक प्रगतीसाठी आणि सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील आहोत. मी त्याच विकासाची मालिका अखंडपणे पुढे चालवत असताना अशा विकास कामातून दलित वस्तीतील समाज बांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काही काळामध्येही अशी विकास कामे गावातील निरनिराळ्या वॉर्डामध्ये तसेच वाड्यावर सुरू राहतील असा विश्वास त्यांनी बोलताना व्यक्त केला.
या भूमिपूजनाप्रसंगी उपसरपंच अशोक आसबे, तंटामुक्तीचे अध्यक्ष भगवान आसबे, अभिमान जानकर,सिद्धेश्वर बाबर, व्हा. चेअरमन अमोल जानकर,भजनदास जानकर, रामेश्वर माने, मा.सरपंच शुभांगी वाघमारे, सुमन वाघमारे,दीपाली वाघमारे, खंडू कोळी,दासू वाघमारे, अमोल वाघमारे, मंगेश सातपुते, शानूर धनवजीर, स्वप्ना वाघमारे,माधुरी वाघमारे तसेच सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी, दलित वस्ती येथील समाज बांधव व इतर ग्रामस्थ नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.