मंगळवेढा पोलीसांनी घेतला 12 तासाचे आत खुनातील आरोपी ताब्यात
मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज,ता. 24/03/ 2025-मंगळवेढा पोलीसांनी 12 तासाचे आत खुनातील आरोपी आरोपी भिमराव उर्फ बाळू कृष्णा चौगुले वय 35 वर्षे, रा.बोराळे ता. मंगळवेढा याला ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी या गुन्ह्याबाबत दिलेली माहिती अशी यातील आरोपी भिमराव उर्फ बाळू कृष्णा चौगुले वय 35 वर्षे, रा. बोराळे ता. मंगळवेढा याने मध्यस्थी राहुन यातील मयत महेश उदयकुमार गोवर्धन यास बटईने घेतलेल्या मौजे तामदर्डी येथील शेतीसाठी लागणारे ठिबक सिंचनचे साहित्य घेवुन दिले होते. त्याचे पैसे यातील मयत महेश गोवर्धन याचेकडुन येणे बाकी होते. यातील आरोपीत हा त्या पैशाची फोनवरुन मागणी करत होता. त्यावेळी त्यांच्यामध्ये फोनवर वादावादी झाली होती. त्याचा राग मनात धरुन यातील आरोपी भिमराव उर्फ बाळ चौगुले याने दि. 23/03/2025 रोजी 21/30 वा. चे सुमारास मौजे बोराळे ता.मंगळवेढा येथील छत्रपती चौक येथे मयत महेश गोवर्धन याचे छातीत चाकु सारख्या हत्याराने वार करून त्यास गंभीर दुखापत करुन जीवे ठार मारले आहे. याबाबत गु.र.नं. 215/25 बी.एन.एस. 2023 चे कलम 103 (1), 352, 351(2), 351(3) प्रमाणे गुन्हा मंगळवेढा पोलीस ठाणे येथे रजिस्टर करण्यात आला आहे.
यातील आरोपीत हा गुन्हा घडल्यापासुन फरार होता.त्याचा गोपनीय बातमीदारां मार्फत शोध घेतला.सदरची कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी,सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, सोलापूर ग्रामीणचे अप्पर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड मंगळवेढा उपविभाग यांचे मार्गदर्शनाखाली मंगळवेढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्ताञय बोरीगिड्डे,सपोनि विनोद लातुरकर, सपोनि अंकुश वाघमोडे, पोसई विजय पिसे, पोहेको श्री खंडागळे, पोहेको श्री वाघमोडे, पोहेको श्री पवार, पोहेकों श्री कांबळे, पोहेकों श्री गेजगे, पोना श्री दुधाळ, पोकों श्री देशमुख यांनी 12 तासाचे आत ताब्यात घेतले आहे. गुन्ह्याचा अधिक तपास सपोनि अंकुश वाघमोडे हे करत आहेत.