गुंजेगाव ता.मंगळवेढा येथे दुहेरी हत्याकांड, आरोपींना अटक
मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज – दि.11/03/ 2025 रोजी सकाळी 09/10 वा चे सुमारास मी माझे घरी असताना माझा भाऊ चंद्रकांत पाटील रा.ढोबळे वस्ती गुंजेगाव ता मंगळवेढा जि सोलापूर याने माझे मोबाईलवर फोन करून मी रिना आप्पासो ढोबळे चे घरी आहे.येथे खुप मोठे भांडण होण्याची शक्यता आहे.येथे रिनाचे दिर लक्ष्मण ढोबळे व त्यांचे नातेवाईक आमचे सोबत भांडण करण्यासाठी जमलेले आहेत त्यांचे हातात लोखंडी पाईप,लोखंडी हातोडा,काठ्या, कोयता आहे तु लवकर ये असे कळविल्याने मी लागलीच माझ्या मोटारसायकलने रिना ढोबळेंच्या घराजवळ सकाळी 09/30 वा चे सुमारास पोहचलो. मी जवळ जावुन पाहिले असता रिनाच्या पत्र्याच्या शेडमध्ये लक्ष्मण ढोबळे हा त्याच्या हातातील हातोड्याने माझा भाऊ चंद्रकांत व रिना ढोबळे यांच्या डोक्यात फटके मारत होता.ज्ञानेश्वर बाळकृष्ण खुळपे हा त्याच्या हातातील कोयत्याने त्या दोघांवर वार करीत होता तसेच सचिन किसन कारंडे प्रदीप किसन कारंडे हे त्यांचे हातातील लोखंडी पाईपने रीना व चंद्रकांत यांच्या डोक्यात मारत होते.गणेश लक्ष्मण ढोबळे, कैलास किसन कारंडे,निशांत तुकाराम ढोबळे हे त्यांचे हातातील काठीने त्या दोघांना मारत होते.त्यामुळे झालेल्या या मारहाणीमध्ये माझा भाऊ चंद्रकांत पाटील व रीना ढोबळे हे गंभीर जखमी होऊन जागेवर पडले होते.मी माझ्या भावाला सोडवण्याकरता गेलो असता सतीश कारंडे,प्रदीप कारंडे यांनी मला जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या हातातील लोखंडी पाईपने माझ्या डोक्यात मारून गंभीर जखमी केले तसेच गणेश ढोबळे, कैलास कारंडे, निशांत ढोबळे यांनी त्यांच्या हातातील काठीने माझ्या हाता पायावर मारहाण करून जखमी केले तसेच लक्ष्मण ढोबळे आणि ज्ञानेश्वर कोळपे यांनी पुन्हा आमचे वस्तीवर आला तर जिवंत सोडणार नाही अशी धमकी देऊन ते पळून गेले. त्यानंतर मला सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी नेण्यात आले होते.तेथे उपचार चालू असताना माझ्या नातेवाईकां कडून समजले की माझा भाऊ चंद्रकांत पाटील आणि रिना ढोबळे यांना वरील लोकांनी त्यांच्या हातातील हत्याराने मारहाण करून गंभीर जखमी करून जीवे ठार मारले आहे अशा मजकूराची फिर्याद रावसाहेब तात्यासाहेब पाटील वय 40 वर्ष व्यवसाय शेती रा राजापुर ता सांगोला जि. सोलापुर यांनी देत नमूदचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यानंतर अटक आरोपी लक्ष्मण विठोबा ढोबळे,सतीश किसन कारंडे,प्रदिप किसन कारंडे,गणेश लक्ष्मण ढोबळे,निशांत तुकाराम ढोबळे सर्व रा.गुंजेगाव ता मंगळवेढा जि सोलापूर यांना न्यायालयाने दिनांक 18/03/2025 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.स.पो.नि.वाघमोडे यांनी तक्रार दाखल केली असून तपास पो.नि.श्री.बोरीगिड्डे हे करत आहेत.