आ.समाधान आवताडे यांच्या प्रयत्नांतून मंगळवेढा तालुक्यामध्ये नवीन आरोग्य उपकेंद्र बांधकामासाठी भरीव निधी मंजूर

आ.समाधान आवताडे यांच्या प्रयत्नांतून मंगळवेढा तालुक्यामध्ये नवीन आरोग्य उपकेंद्र बांधकामासाठी २ कोटी ४४ लाख निधी मंजूर

मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१०/०३/२०२५ – पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या प्रयत्नांतून व पाठपुराव्यातून तालुक्यामध्ये नवीन आरोग्य उपकेंद्र बांधकामासाठी निधी मंजूर झाला असल्याची माहिती जनसंपर्क कार्यालय मंगळवेढा यांच्यावतीने देण्यात आली आहे.

सदर निधी प्राप्त होण्यासाठी आमदार समाधान आवताडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार,आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर तसेच पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून संबंधित आरोग्य विभागाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून हा निधी मंजूर करून आणला आहे.

या मंजूर निधीतून तालुक्यातील येड्राव,सोड्डी, सलगर बु, कचरेवाडी या ठिकाणच्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्रच्या बांधकामासाठी प्रत्येकी ६१ लाख १९ हजार रुपये निधी मंजूर झाला असल्याने त्या त्या भागातील आरोग्य यंत्रणा गतिमान होत असल्याने याचा मोठा फायदा रुग्णसेवेसाठी होणार आहे.

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाची लोकप्रतिनिधी म्हणून धुरा खांद्यावर आल्यापासून आमदार समाधान आवताडे यांनी सार्वजनिक आरोग्य सेवेच्या विकासाला मोठी चालना दिली आहे.

यापूर्वी आमदार समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून मंगळवेढा येथील प्राथमिक आरोग्य ग्रामीण रुग्णालय केंद्रात १०० बेडचे सुसज्ज आणि अत्याधुनिक साधन-सामुग्रीने सुसज्ज असे हॉस्पिटल उभा राहण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तसेच ग्रामीण भागातील उपकेंद्रांसाठी मंजूर झालेल्या या निधीमुळे संपूर्ण तालुक्यातील आरोग्य यंत्रणा मोठ्या परिवर्तनात रुग्णांसाठी उपलब्ध होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top