समृद्धी एक्सप्रेसवे वर टायर फुटल्याने अपघात 2 जणांचा मृत्यू, 13 जखमी


apghat
मुंबई-नागपूर द्रुतगती महामार्गर एक एसयूव्ही उलटून दुसऱ्या वाहनाला धडकल्याने दोन जणांचा मृत्यू झाला तर13 जण जखमी झाले. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांनी ही माहिती दिली. सिंधखेड राजा पोलिस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, सकाळी 9 वाजताच्या सुमारास 15 प्रवाशांना घेऊन जाणारी एसयूव्ही यवतमाळहून भाविकांना घेऊन शिर्डीकडे जात असताना हा अपघात झाला. 

ALSO READ: महाराष्ट्रात गुइलेन-बॅरे सिंड्रोमचा उद्रेक,225 रुग्णांची नोंद, 12 जणांचा मृत्यू

एसयूव्हीचा एक टायर फुटला आणि ती नियंत्रणाबाहेर जाऊन उलटली आणि याच दरम्यान मागून येणाऱ्या एका कारनेही तिला धडक दिल्याने अपघात झाला आणि या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. तर 13 जखमी झाले. 

ALSO READ: नागपुरात अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची कारवाई
अपघातात जखमी झालेल्या13 जणांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, त्यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे, अशी माहिती त्यांनी दिली. अधिकाऱ्याने सांगितले की, अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलिस आणि आपत्कालीन सेवा पथक घटनास्थळी पोहोचले. या अपघातामुळे एक्सप्रेस वेवरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली.

Edited By – Priya Dixit 

ALSO READ: शरद पवार पक्षाच्या महिला शाखेने महिला सुरक्षेबाबत मोठे पाऊल उचलले, राष्ट्रपतींना लिहिले पत्र



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top