छत्रपती शिवाजी महाराजांनी देशातून मोघलाई नष्ट केली-केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
छत्रपती शिवाजी महाराजांनी अतुलनीय शौर्य धैर्य आणि महापराक्रम गाजवित कल्याणकारक स्वराज्य आणि सुराज्य निर्माण केले

मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.19- छत्रपती शिवाजी महाराजांनी अतुलनीय शौर्य धैर्य आणि महापराक्रम गाजवित या देशातून जुलमी मोघलाई नष्ट केली. कल्याणकारक स्वराज्य आणि सुराज्य निर्माण केले असे प्रतिपदान रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केले.छत्रपती शिवाजी महाराजांच्या 396 व्या जयंती निमीत्त देशभरातील शिवप्रेमी जनतेला सर्व भारतीयांना शिव जयंती च्या शुभेच्छा दिल्या आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज हे मूर्तिमंत शौर्य होते.त्यांनी निर्माण केलेले स्वराज्य हे आदर्श शिवशाही सुराज्य होते.त्यांचे या देशासाठी युगप्रवर्तक योगदान आहे. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आपले काय झाले असते हे सांगता येत नाही.या देशात मुघलांनी थैमान घातले असते.मुघलांची अन्यायकारक मोघलाई छत्रपती शिवाजी महाराजांनी अतुलनीय शौर्य गाजवून नष्ट केली त्यांचा आम्हाला अभिमान आहे.त्यांनी गनिमी काव्याने केलेले युद्ध जगात आश्चर्य ठरले आहे.त्यांच्या राज्यात महिलांवर जर कोणी अत्याचार केला तर त्यांचे हातपाय तोडून त्यांचा कडेलोट केला जात होता. छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श राजे होते.दलित जनता ही डॉ बाबासाहेब आंबेडकरांना मानते तसेच छत्रपती शिवाजी महाराजांना मानते असे सांगत सर्व शिवप्रेमी जनतेला ना. रामदास आठवले यांनी शिवजयंती च्या शुभेच्छा दिल्या आहेत.