त्या आंदोलनामुळे काही विपरीत सामाजिक परिस्थिती निर्माण झालेस त्याला सर्वस्वी शासनाची कृती जबाबदार असेल -सांगली जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटना
शासन दरबारी कुठेही नोंद नसलेल्यांना उशिरा जन्म मृत्यू नोंदणी करून मिळावी

पलूस सांगली/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१७/०२/ २०२५- आज तहसीलदार पलूस यांना शासन दरबारी कुठेही नोंद नसलेल्यांना उशिरा जन्म मृत्यू नोंदणी करून मिळावी या संदर्भात निवेदन देण्यात आले. जन्म मृत्यू नोंदणी कायदा 1969 नुसार उशिरा जन्म मृत्यू नोंदणी संदर्भात ज्यांच्या जन्माची अथवा मृत्यूची नोंद स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ग्रामपंचायत,नगरपालिका दप्तरी नोंदवलेले नव्हते अशा मृत्यू झालेल्या इसमांच्या वारसांना व जन्म नोंद नसणाऱ्या इसमांना दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ तर यांचे समोर अर्ज करून जन्माची अथवा मृत्यूची नोंद घालणे संदर्भातील आदेश प्राप्त करावा लागत होता.ही न्यायालयीन प्रक्रिया थांबवून ते अधिकार उपविभागीय अधिकारी यांना दिले होते.हे अधिकार दिनांक २१/०१/२०२५ च्या शासन परिपत्रकानुसार स्थगित केले असून उशिरा जन्म व मृत्यू प्रमाणपत्र वितरित करण्याची कारवाई पुढील आदेशापर्यंत ते तहकूब ठेवण्यात आलेली आहे त्यामुळे उशिरा जन्म व मृत्यू नोंदी कामे नोंदवणे बंद झाले असून त्याचा फटका विद्यार्थी ,सर्वसामान्य शेतकरी , नोकरवर्ग व महसुली खात्यातील नोंदी शालेय कामकाजात अडचणी निर्माण होऊन बऱ्याच लोकांना त्याचा तोटा होत असून लोकांच्या अडचणीत वाढ झालेली आहे. याची गंभीर दखल घेऊन उशिरा जन्म मृत्यू प्रमाणपत्र आपल्या अधिकारात आपण देण्याची कृती करावी अन्यथा नाईलाजास्तव आम्हाला शालेय विद्यार्थी, शेतकरी यांना सोबत घेऊन जन आंदोलन उभा करावे लागेल त्या आंदोलनामुळे काही विपरीत सामाजिक परिस्थिती निर्माण झालेस त्याला सर्वस्वी शासनाची कृती जबाबदार असेल याची नोंद घ्यावी असे निवेदन सांगली जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आले असे स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी पंचायत सदस्य पलूस संदीप राजोबा यांनी सांगितले.
यावेळी पलूस तालुकाध्यक्ष बाळासो शिंदे, धन्यकुमार पाटील, मनोहर पाटील, वैभव सावळवाडे, रोहित पाटील, संदीप पाटील, संतोष राजोबा आदी उपस्थित होते.