लाइफटाइम फास्टॅग पास: गेम चेंजर ?
सरकार खाजगी कार मालकांसाठी वार्षिक आणि आजीवन टोल पास सुरू करण्याचा विचार करत आहे, जो विद्यमान FASTag प्रणालीशी एकत्रित केला जाईल. प्रस्तावित वार्षिक पासची किंमत ₹३,००० आहे तर आजीवन पासची किंमत ₹३०,००० आहे. या पासचे उद्दिष्ट राष्ट्रीय महामार्गांवर अमर्यादित प्रवेश प्रदान करणे, टोल पेमेंट सुलभ करणे आणि प्रवासाची सोय वाढवणे अशी आहे असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

६.९ कोटींहून अधिक फास्टॅग आतापर्यंत जारी केले आहेत आणि ९७% प्रवेश दर आहे.फास्टॅग प्रणालीने टोल प्लाझावर प्रतीक्षा वेळ कमी करून वापरकर्त्याच्या अनुभवात लक्षणीय सुधारणा केली आहे.टोल प्लाझावरुन जाणारे जवळील रहिवाशी आणि सामाजिक संघटना यांचे टोल आकारणी वरून टोल प्लाझावर सातत्याने वाद होऊन टोल प्लाझाची तोडफोड,तेथील कर्मचार्यांबरोबर मारहाणीचे प्रमाण बरेच आहे यालाही आळा घालण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचेही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
हे प्रस्तावित पास भारतातील रस्ते प्रवासात क्रांती घडवू शकतात,परंतु पात्रता निकष आणि अंमलबजावणीच्या वेळापत्रकासारख्या प्रमुख तपशीलांवर अजूनही चर्चा सुरू आहे. हा उपक्रम प्रवास सुलभ करेल की नवीन आव्हाने सादर करेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.