शुक्रवारी हॉटेल ग्रँड रेसिडेन्सीचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन

शुक्रवारी हॉटेल ग्रँड रेसिडेन्सीचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन

पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०६/०२/२०२५ –पंढरपूर पासून पंधरा ते वीस मिनिट अंतरावर असलेल्या करकंब नजीक उभारण्यात आलेल्या हॉटेल ग्रँड रेसिडेन्सी या पंचतारांकित हॉटेलचे उद्घाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते शुक्रवार दिनांक ७ फेब्रुवारी २०२५ रोजी होणार आहे.

या कार्यक्रमासाठी माजी गृहमंत्री बाळ नांदगावकर, भाजपाचे पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार अभिजीत पाटील, आमदार राजू खरे, शिवसेनेचे शिवाजी सावंत, मनसेचे अनिल शिदोरे, अविनाश अभ्यंकर, सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले उपस्थित राहणार असल्याची माहिती मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

देशभरातून भाविक पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी येत असतात या येणाऱ्या भाविकांची सोय व्हावी.
या उद्देशाने पंढरपूर पासून पंधरा ते वीस मिनिट अंतरावर असलेल्या करकंब नजीक मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या संकल्पनेतून हॉटेल ग्रँड या पंचतारांकित हॉटेलची १ लाख ४ हजार स्क्वेअर फुट जागेत निर्मिती करण्यात आली आहे.
यामध्ये ५० रूम, तीन हजार स्क्वेअर फुटचा हॉल, पंचवीस हजार स्क्वेअर फुट लॉन, स्विमिंग पूल, प्रशस्त पार्किंगची सोय करण्यात आली आहे.

याचबरोबर हॉटेल श्रीयश रेस्टॉरंटची मुंबईच्या धरतीवर निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये पंचतारांकित हॉटेल प्रमाणे विविध प्रकारच्या जेवणाचे मेनू मिळणार आहेत.
याद्वारे १०० तरुणांना रोजगार मिळणार असल्याची माहिती मनसेनेचे नेते दिलीप धोत्रे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top