पालकमंत्री ना.जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत आमदार अभिजित पाटील मांडलेल्या मुद्दांवर सकारात्मक चर्चा

पालकमंत्री ना.जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत माढा चे आमदार अभिजित पाटील मांडलेल्या मुद्दांवर सकारात्मक चर्चा

सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३०/०१/२०२५- सोलापूर जिल्हा नियोजन समितीची बैठक आज पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत पार पडली.या बैठकीत माढा चे आमदार अभिजित पाटील मांडलेले मुद्दे :

भोसे गावात मंजूर असलेल्या शासकीय रूग्णालय इमारत व जागा उपलब्ध करून द्यावी.
पंढरपूर येथे मराठा भवनसाठी ५कोटी निधी मंजूर केला असून तो १०कोटी मंजूर करण्यात यावा.
टेंभूर्णी शहरातील अवैध धंद्यांना आळा घालणे.
माढा तालुक्यातील नॅशनल बँका कर्ज वाटपासाठी नागरिकांना नाहक त्रास देत आहेत त्याबाबत संबंधीत बँकांना सुचना द्याव्यात.

पेहे,नेमतवाडी येथील अतिवृष्टी पिक विमा खात्यावर जमा नाही तरी लवकरात लवकर जमा करण्यात यावा.
माढा तहसील कार्यालयाच्या अडचणी मांडल्या असून त्यात लवकरच तोडगा निघेल असा विश्वास आमदार अभिजीत पाटील यांनी व्यक्त केला.आमदार अभिजीत पाटील पुढे बोलताना म्हणाले की मी मांडलेल्या मुद्यांवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

या बैठीकीसाठी आमदार सुभाष देशमुख, खासदार ओमराजे निंबाळकर,आमदार दिलीप सोपल,आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार उत्तम जानकर,आमदार नारायण पाटील, आमदार राजाभाऊ खरे, आमदार देवेंद्र कोठे,आमदार अभिजित पाटील, आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद तसेच जिल्हा पातळीवरील सर्व प्रशासकीय अधिकारी तसेच पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top