भंडारा बॉम्बस्फोटात शहीद झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मृत्यूबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी शोक व्यक्त केले,नाना पटोलेंचा मोदी सरकारवर घणाघात



भंडारा जिल्ह्यात एका आयुध निर्माणीमध्ये आज सकाळी भीषण स्फोट झाला असून या अपघातात 5 कर्मचाऱ्यांचा मृत्यु झाला. स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थली दाखल झाल्यासून बचावकार्य सुरु झाले आहे. या मध्ये आता पर्यन्त पाच  कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळाले आहे. 
 

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फड़णवीसांनी  या भीषण अपघातावर शोक व्यक्त केले आहे. त्यांनी ट्विटरवर ट्वीट करूं शोक व्यक्त करून मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे तसेच जखमींच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

ALSO READ: भंडारा येथील ऑर्डिनन्स फॅक्टरीत स्फोट, 5 जणांचा मृत्यू

त्यांनी ट्विटरवर लिहिले की, “भंडारा जिल्ह्यातील आयुध निर्माणीतील स्फोटानंतर छत कोसळल्याने 13 ते 14 कामगार अडकल्याची माहिती आहे. त्यातील पाच जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक घटनास्थळी असून सर्व प्रकारची मदत केली जात आहे. एसडीआरएफ आणि नागपूर महानगरपालिकेच्या पथकांनाही बचाव कार्यासाठी पाचारण करण्यात आले असून ते लवकरच पोहोचतील.”

 

या घटनेची माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले, “जिल्हा प्रशासन संरक्षण दलांच्या समन्वयाने बचाव कार्यात गुंतले आहे. वैद्यकीय मदतीसाठी पथकेही सज्ज ठेवण्यात आली आहेत. आतापर्यंत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार या घटनेत एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो.”

या अपघातावर नाना पटोले यांनी मोदी  सरकारवर घणाघात केला आहे.त्यांनी याला मोदी सरकारला जबाबदार ठरवले आहे. मोदी सरकारचे हे अपयश असल्याचे ते म्हणाले.  

Edited By – Priya Dixit 

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top