श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरास एक लक्ष रुपयाची देणगी
पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.23 – श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीस इंदुमती रामचंद्र दळवी राहणार पुणे यांनी एक लक्ष रुपयांची देणगी दिल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.

त्याबद्दल देणगीदार यांचा मंदिर समितीच्यावतीने मंदिर समितीचे लेखाधिकारी मुकेश अनेचा यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची प्रतिमा व उपरणे देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी देणगीदार यांचे कुटुंब व देणगी विभाग प्रमुख राजेश पिटले उपस्थित होते.
संबंधित देणगीदार यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या अन्नछत्रासाठी देणगी देण्याची इच्छा मंदिर समितीच्या सदस्या ॲड.माधवी निगडे यांच्याकडे व्यक्त केली होती. त्या दर महिन्याला श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येत असतात. जास्तीत जास्त भाविकांना अन्नदान व्हावे अशी त्यांची मनोमन इच्छा आहे. सदरची देणगी त्यांनी कै.लक्ष्मी शिवाजी दळवी व कै.रामचंद्र दगडोबा दळवी या आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ दिली आहे.