शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेत्वाखालील शिवसेनेत मोठ्या प्रमाणावर प्रवेश
सर्वांचे शिवसेना परिवारात खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी केले स्वागत

परभणी /ज्ञानप्रवाह न्यूज – वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचाराने शिवसेनेची घोडदौड कायम ठेवणारे शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याने प्रभावित होऊन अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष श्री.सईद खान यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) गटाचे माजी जिल्हापरिषद अध्यक्ष महेश फड, पाथरी नगर परिषदेचे उपाध्यक्ष आयुब खान उर्फ लालु खान,अली अफसर अन्सारी तसेच पाथरी नगर परिषदेचे सभापती अलोक नारायणराव चौधरी यांच्यासह पाथरी आणि मानवत नगरपरिषदेच्या अनेक नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला.

यावेळी पाथरीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामप्रसाद कोल्हे पाटील, गणेश सखाराम दुगाणे,शेख दस्तगीर शेख हसन,संजीव मारोतराव सत्वधर यांनीदेखील प्रक्ष प्रवेश केला.

परभणी जिल्हातील पोखर्णी तसेच पेडगाव सर्कल येथील उबाठा गटातील कित्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी देखील शिवसेनेचा भगवा हाती घेत पक्ष प्रवेश केला.

या सर्वांचे शिवसेना परिवारात खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी स्वागत करुन त्यांना नियुक्ती पत्र देत पुढील सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.