केंद्रात सरकार वाचवणे हे उध्दव ठाकरे व शरद पवार यांच्याच हातात- बच्चु कडू
मतदानंच चोरून घेतल तर भ्रष्टाचार काय आहे – बच्चु कडू
पिक विम्यासाठी 1 रुपया का घेता-बच्चु कडू
भविष्यात अजित पवार व एकनाथ शिंदे यांना सत्तेतुन बाहेर काढण्याचा भाजपचा डाव- बच्चु कडू
पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- पंढरपूर विश्रामगृह येथे प्रहार संघटनेचे संस्थापक तथा दिव्यांग मंत्रालयाचे विद्यमान अध्यक्ष बच्चु कडू यांची प्रमुख पदाधिकारी यांची बैठक संपन्न झाली. यावेळी येणाऱ्या जिल्हा परिषद,पंचायत समिती,नगरपालिका निवडणुकीत प्रहार सोलापूर जिल्ह्यात आपले उमेदवार उभा करणार असून तसेच महाराष्ट्राची दक्षिण काशी म्हणुन संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून ज्या विठ्ठलाची ओळख गोरगरीब, कष्टकरी यांचा देव म्हणून आहे. त्या पंढरपूरच्या पावन नगरीतुन सुरुवात करणार असल्याचे यावेळी बच्चु कडू यांनी व्यक्त केले.

तर भविष्यात प्रहार संघटनेची ओळख पांडूरंगाच्या पंढरीतून संपूर्ण महाराष्ट्राला झाली पाहिजे. येणार्या सर्वच निवडणूकी मध्ये प्रहार जनशक्ती पक्ष आपली ताकत दाखवेल. पंढरपूर शहर व तालुक्यात गावं तिथं शाखा, गांव तिथं प्रहार हा उपक्रम जोरात राबवून गोरगरीब, दिव्यांग, विधवा,निराधार, कामगारांना न्याय देण्यासाठी आंदोलन करून गुन्हे दाखल झाले तरी चालतील असे परखड मत व्यक्त केले.

यावेळी तालुका प्रमुख संतोष मोरे यांनी बच्चुभाऊ कडू यांचे आदेशाने व जिल्हा अध्यक्ष दत्ता मस्के व उपाध्यक्ष रमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाने संघटना वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
सर्वसामान्य माणसाला शासकिय कार्यालयात न्याय मिळत नसेल तर अधिकार्याना चोप देऊन साडेतीनशे गुन्हे अंगावर घेणारा बच्चु कडू आहे.प्रहारच्या पदाधिकार्यांनी सुद्धा फक्त पद घेऊन बसण्यापेक्षा जर सर्वसामान्य जनतेला एखाद्या कार्यालयात वारंवार हेलपाटे घालवे लागत असतील तर आंदोलन करून अधिकार्याना चोप देऊन गुन्हे अंगावर घेतले तर काय हरकत आहे असे मत बच्चु कडू यांनी पंढरपूरात व्यक्त केले.