नाशिक मध्ये सराफा व्यावसायिक पिता-पुत्राची कर्जाला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या


poison
नाशिक शहरात सराफा व्यावसायिक आणि त्याच्या मुलाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.कर्जबाजारीपणामुळे त्याने हे पाऊल उचलले असावे, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. प्रशांत आत्मारामसेठ गुरव (49) आणि अभिषेक प्रशांत गुरव(28) अशी मृतांची नावे आहेत,

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंचवटी जवळ रामराज्य संकुल अपार्टमेंटमध्ये राहणारे गुरव पितापुत्र यांचे सराफा बाजारात दागिन्यांचे दुकान होते. त्यांच्यावर इतके कर्ज होते की ते अडचणीत सापडले. त्यांनी अखेर विषप्राशन करून आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल घेतले. त्यांच्या घरात सुसाईड नोट सापडली आहे. त्याचा तपास पोलीस करत आहे. प्रशांत आणि अभिषेक यांनी सोमवारी सकाळी पहाटे विषप्राशन केले.

ALSO READ: बेंगळुरूमध्ये 6 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या, पोलिसांनी आरोपीला केली अटक
पोलिसांनी त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले असता शवविच्छेदनाच्या अहवालात विषप्राशन केल्याचे समजले आहे. पोलीस मृतांच्या मोबाइलफोन आणि सोशलमिडीया अकाउंट्सची चौकशी करत आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटनेच्या वेळी प्रशांत यांची पत्नी कर्नाटक सहलीला गेली होती. पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत आहे. 

Edited By – Priya Dixit

 

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top