भोर आणि वेल्हे येथे विकास आणि एकात्मतेची वाटचाल: सायबेजआशा ट्रस्टचे प्रेरणादायी उपक्रम

भोर आणि वेल्हे येथे विकास आणि एकात्मतेची वाटचाल: सायबेजआशा ट्रस्टचा प्रेरणादायी उपक्रम

भोर/ज्ञानप्रवाह न्यूज –भोर आणि वेल्हे तालुक्यांमध्ये सायबेजआशा ट्रस्टने गावांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेल्या पुढाकारामुळे सकारात्मक बदल घडवून आणले आहेत. शेती विकास, सार्वजनिक विकास कामे, महिलांचा सशक्तीकरण आणि कौशल्य विकास या क्षेत्रांमध्ये ट्रस्टच्या उपक्रमांमुळे अनेकांचे जीवन बदलले असून, समाजामध्ये एकतेची भावना निर्माण झाली आहे.

ट्रस्टने 2023 पासून सुरू केलेल्या भात गट शेती स्पर्धा आणि शेतकरी क्रिकेट स्पर्धा या अनोख्या उपक्रमांमुळे शेतकऱ्यांमध्ये सहकार्य आणि बंधुत्व वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. यावर्षी या क्रिकेट स्पर्धांना शेतकरी पुरुष आणि महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून 100 हून अधिक संघांनी सहभाग घेतला.

या स्पर्धांसाठी ट्रस्टने उदार बक्षीस रक्कम जाहीर केली आहे – विजेत्यांसाठी ₹33,000, उपविजेत्यांसाठी ₹22,000, आणि तिसऱ्या क्रमांकासाठी ₹11,000, पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र गटात.

अनेक महिलांसाठी ही क्रिकेट खेळण्याची पहिलीच वेळ होती. आम्ही कधी क्रिकेट खेळलो नव्हतो, पण खूप आनंद झाला, असे महिलांनी सांगितले. 70 वर्षांच्या वयाच्या ज्येष्ठ शेतकऱ्यांनीही मैदानावर उतरत आनंद व्यक्त केला.

या उपक्रमामुळे आम्हाला एकत्र येऊन खेळायला आणि साजरा करायला मिळाले. हा फक्त क्रिकेटचा खेळ नाही, तर लोकांना एकत्र येऊन प्रगतीसाठी काम करण्यास प्रेरणा देणारा उपक्रम आहे, असे एका सहभागींनी नमूद केले.

सायबेजआशा ट्रस्टच्या अशा नवकल्पना समाजाला बळकट करण्यासाठी महत्त्वाचा आधार ठरत आहेत आणि विकास व एकतेचा संदेश पसरवत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top